मनोरंजन

वा गं म्हशी! वाचवलास कासवाचा जीव: Video Viral

प्राणीमैत्रीच्या (Animal Love) अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओला (social media) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - प्राणीमैत्रीच्या (Animal Love) अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओला (social media) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. माणसांना बोलण्याची कला अवगत आहे. प्राण्यांचा संवाद हा नजरेतून, स्पर्शातून, गंधातून होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भलेही ते एकमेकांच्या पूर्ण विरोधी प्रकृतीचे असोत मात्र अनेकदा त्यांच्यातील हा संवाद कमालीचा अर्थपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. त्याप्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रियही झाले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीड़ियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका म्हशीनं पाठीवर पडलेल्या कासवाला (tortoise) सरळ केल्याचे दिसत आहे.

त्या व्हिडिओनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्याला लहानपणापासून नेहमी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. संकटात असणाऱ्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. असं सांगितलं जात. किमान आपल्याला सांगायला कोणीतरी असतं. मात्र प्राण्यांना असं काही शिकवावं लागत नाही. त्यांच्यात ती भावना आपसूक असते. हे आता या व्हिडिओतून दिसून आलं आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की, एक कासव त्याच्या पाठीवर पडलं आहे. त्यामुळे त्याला काहीच हालचाल करता येत नाहीये. ते सरळ होण्यासाठी धडपडत आहे. त्यावेळी एक म्हैस त्या कासवाच्या मदतीला धावून आली आहे. तिनं त्या कासवाची मोठी मदत केली आहे.

कासवानं बराच काळ मेहनत केल्यानंतरही त्याला काही यश आलं नाही. ते पाहून म्हशीनं आपल्या शिंगानं त्या कासवाची मदत केली आहे. हा व्हिड़िओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला आतापर्यत 25 हजारापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेयर केला आहे. त्या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे... कुणीही दयाळु असु शकतो. म्हशीनं कासवाला आपल्या शिंगानं सरळ केल्यानंतर ती तिथून निघून जाते. त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT