मनोरंजन

उद्योगपती कुमार मंगलम यांची अनन्या म्हणते, 'व्हेन आय एम अलोन'...

युवा पिढीची एक यशस्वी गायक आणि संगीतकार, अनन्या बिर्लानं 'हिंदुस्तानी वे'च्या भारी यशानंतर आपला बहुप्रतीक्षित ट्रॅक 'व्हेन आय एम अलोन'चा आता प्रेक्षकांसमोर आला आहे.

युगंधर ताजणे

युवा पिढीची एक यशस्वी गायक आणि संगीतकार, अनन्या बिर्लानं 'हिंदुस्तानी वे'च्या भारी यशानंतर आपला बहुप्रतीक्षित ट्रॅक 'व्हेन आय एम अलोन'चा आता प्रेक्षकांसमोर आला आहे. 'हिंदुस्तानी वे' च्या अफाट लोकप्रियतेनंतर हा तिचा नवा प्रोजेक्ट आहे. त्यात ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी अनन्यानं भारतातील क्रीडा विश्वासाठी एक गीत तयार केलं होतं. ते गायलही होतं. आज जग महामारीच्या आणि प्रचंड नैराश्याच्या गर्तेतून जात आहे. 'व्हेन आय एम अलोन'मध्ये हे दाखवण्यात आले आहे की आयुष्यात गोष्टी कशा आकार घेतात, कशा त्यातल्या काही गोष्टी आपोआप गळून पडतात.

रिफ्लेक्टिव ट्रॅक, 'सेल्फ लव'बाबत असून यातील अनुभव कसा व्यक्तिला विकसित करण्यासाठी आणि त्याच्या परिप्रेक्ष्याला बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. याची मांडणीही त्या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. हा व्हिडीओ स्वतः अनन्यानं दिग्दर्शित केला असून स्वतःच्या आयुष्यातील जसे आहेत तसे, क्षणांना यात चित्रित केले आहेत. प्रासंगिक, वास्तविक आणि प्रामाणिक असा हा ट्रॅक आपल्या सद्यस्थितीचे विशेष प्रासंगिक रूप आहे कारण संपूर्ण जग आज एका वैश्विक महामारीसोबत झगडत आहे. अनन्या बिर्ला आपल्या या गाण्याविषयी म्हणते की, "मी 'व्हेन आय एम अलोन'मध्ये माझ्याविषयी जेवढे होऊ शकेल तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की माझा जन्म कुठे झाला, मी पहिल्यांदा डेटवर कुठे गेले होते, अशा अनेक गोष्टी, ज्यांनी माझे स्वत्व न हरवता मला आकार दिला आहे. मी या म्युझिक व्हिडीओबाबत खरोखरच खूप उत्साहित आहे आणि हा व्हिडीओ सर्वांना दाखवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही."

या मल्टी-टँलेंटेड कलाकारानं 'व्हेन आय एम अलोन'च्या या म्युझिक व्हिडीओला स्वतः लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. हे गीत त्याच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि आता संगीत प्रेमींसाठी प्रदर्शित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislature Clash: नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी; पण किती दिवसांची? विधिमंडळातील प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Vidhan Bhavan Clash: महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का? विधान भवनातील राडा प्रकरणी मनसेचे नेत्याचा सवाल

Latest Marathi News Updates : उधारीवर घेतलेल्या सोन्याची रक्कम न देता सराफाची फसवणूक

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

SCROLL FOR NEXT