Butterfly Movie trailer out cast madhura welankar abhijeet satam mahesh manjrekar release date 2 june sakal
मनोरंजन

Butterfly Movie: कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या 'ती'ची गोष्ट! भारी फिलिंग देणारा 'बटरफ्लाय'चा ट्रेलर पाहाच

बहुचर्चित "बटरफ्लाय" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! या दिवशी होणार प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

Madhura Welankar: आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो, असा भन्नाट विचार बटरफ्लाय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आला आहे. संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणारा बटरफ्लाय हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत.

(Butterfly Movie trailer out cast madhura welankar abhijeet satam mahesh manjrekar release date 2 june nsa95)

मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे.

वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

प्रत्येक घरातली होममेकर आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र धडपडत असते. पण तिचीही काही स्वप्नं असतात. कामाच्या धावपळीत तिची स्वप्नं मागे पडतात. पण एक दिवस मेघाच्या आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते.

तिला सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय"

सोशल मीडियामध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, ट्रेलरचं कौतुक होत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT