Rupali Bhosle Instagram
मनोरंजन

मराठी मालिका गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतेय महत्त्वपूर्ण भूमिका

स्वाती वेमूल

सोशल मीडियावर सध्या एका मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीचा हा फोटो बराच जुना असून तिचं आताचं बदललेलं रुप पाहून चाहते अवाक् झाले आहेत. जुन्या फोटोमध्ये अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. ही अभिनेत्री आहे रुपाली भोसले Rupali Bhosle. सध्या टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले. रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवर before and after म्हणजेच जुना आणि आताचा असे दोन फोटो एकत्र करून पोस्ट केले आहेत. तिचं ट्रान्सफॉर्मेशन सर्वांनाच थक्क करणारं आहे. (can you guess this popular marathi tv actresss who is now featuring in aai kuthe kay karte)

'अपयशी ठरण्यात काहीच चुकीचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्यात तुम्ही पुन्हा उंच भरारी घेऊ शकता', असं सकारात्मक कॅप्शन देत रुपालीने हा फोटो पोस्ट केला आहे. 'माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि न ठेवणाऱ्यांचेही आभार. ही मुलगी बऱ्याच अडीअडचणींमधून इथपर्यंत आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणजे मी आणि खरंच ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मोठा प्रवास, असंख्य संकटं आणि अडचणी पण आता कसलाच पश्चात्ताप नाही. गोष्टी आणि लूक आता पहिल्यासारखे नाहीत पण संकटांना सामोरं जाण्याची वृत्ती आजही तशीच आहे. तीच स्वप्नं, लक्ष्य आजही कायम आहेत. मला माझ्यावर अभिमान आहे', असं तिने पुढे लिहिलंय.

रुपालीने 'बिग बॉस मराठी'मध्येही हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती तिने चाहत्यांना दिली होती. अनेक अडचणींचा सामना करत कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रुपालीला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. सध्या तिच्या या फोटोवरही नेटकऱ्यांचे भरभरून लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT