Cardi B escapes charges for throwing mic at fan in Las Vegas The Microphone Being Auctioned For ₹82,00,000  Esakal
मनोरंजन

Cardi B: ऐकावं ते नवलच! कार्डी बीनं चाहत्याला मारुन फेकलेल्या माईकचा होणार लिलाव!

लास वेगासमधील शो दरम्यान कार्डीनं मारुन फेकलेल्या मायक्रोफोनचा eBay वर लिलाव केला जाणार आहे.

Vaishali Patil

Cardi B Viral Video : मनोरंजन विश्वात नेहमीचं काही ना काही असं घडतं की त्यांची खुप दिवस चर्चा रंगत असते. असचं काहीसं हॉलिवूडची लोकप्रिय सिंगर कार्डी बीबाबत घडलं होतं. कार्डी बी अचनाक चर्चेत आली ती तिच्या लाईव्ह शोमुळे. तिच्या लाईव्ह कार्यक्रमात एका चाहत्यांनं तिच्यावर ड्रिंक फेकलं होतं. त्यानंतर रागाच्या भरात कार्डीनंही त्याला हातातला माईक मारुन फेकला.

आता लास वेगासमधील या शो दरम्यान कार्डीनं मारुन फेकलेल्या मायक्रोफोनचा eBay वर लिलाव केला जाणार आहे.

माइक "Sure Xient Digital mic Cardi B throww at a person" म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लास वेगासमधील काही प्रमुख नाइटक्लबना ऑडिओ सपोर्ट देणारी ऑडिओ कंपनी, द वेव्हचे मालक स्कॉट फिशर यांनी हा माईत लिलावासाठी ठेवला आहे.

eBay या माईकचं वर्णन करतांना फिशरने लिहिलयं की, "हा शुअर मायक्रोफोन आहे जो व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. जो कार्डी बी ने 29 जुलै 2023 रोजी ड्रीस बीच क्लबमध्ये एका व्यक्तिला मारुन फेकला होता.( Latest Marathi News )

त्याचबरोबरच फिशरने या विक्रीतून मिळणारा सर्व नफा लास वेगासमधील दोन धर्मादाय संस्थांना दान देणार असल्याचं सांगितलं आहे. या माइकची सध्याची बोली $99,300 म्हणजेच अंदाजे ₹82,00,000 इतकी आहे.

The Microphone Being Auctioned For ₹82,00,000

तर दुसरीकडे एका महिलेने तिला लास वेगास मेट्रोपॉलिटन पोलिसांकडे याची तक्रार केली होती. लास वेगास Blvd च्या 3500 ब्लॉकमध्ये असलेल्या एका इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती ज्यात तिला स्टेजवरून फेकलेल्या वस्तूमुळे दुखापत झाली होती. मात्र आता "कार्डीच्या वतीने, कार्डीवर कोणताही खटला दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT