Actor Prakash Raj  esakal
मनोरंजन

Actor Prakash Raj : प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा दाखल; असं नेमकं काय घडलं?

याआधी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांच्या विरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच भरारी पथकाने केलेल्या या कारवाईची चर्चा रंगली आहे.

बेळगाव : प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाचे प्रमुख तथा बुडाचे नगररचना अधिकारी बी. व्ही. हिरेमठ यांनी मंगळवारी (ता. १०) येथील कॅंप पोलिस ठाण्यात प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

त्या तक्रारीची दखल घेत कॅंप पोलिसांनी प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याआधी बेळगाव ग्रामीणच्या आमदार व महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांच्या विरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर आता प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोमवारी (ता. ८) कर्नाटक जनपर संघटनेच्या वतीने येथील महात्मा गांधी भवन येथे प्रकाश राज यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली होती. भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर या कार्यक्रमातील प्रकाश राज यांच्या भाषणाची माहिती संकलित करण्यात आली. कार्यक्रम हा अराजकीय होता. पण त्या कार्यक्रमात राजकीय वक्तव्य करण्यात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष भरारी पथकाकडून काढण्यात आला.

त्यानंतर पथकाचे प्रमुख बी. व्ही. हिरेमठ यांनी यासंदर्भात कॅंप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचा दावाही पथकाकडून केला आहे. आचारसंहिता भंग केल्याचाच गुन्हा पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. या कार्यक्रमात आर. एस. हिरेमठ, डॉ. बी. टी. ललिता, शिवाजी कागणीकर आदींचीही भाषणे झाली आहे. पण केवळ प्रकाश राज यांच्याच भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे.

बेळगावात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच भरारी पथकाने केलेल्या या कारवाईची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणूक काळात कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. परवानगी न घेता एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तर तेथे राजकीय किंवा निवडणूकीशी संबंधित भाषण किंवा वक्तव्य करण्यास मनाई आहे. त्यामुळेच प्रकाश राज यांच्या भाषणाला आक्षेप घेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT