Munmun Dutta
Munmun Dutta Instagram
मनोरंजन

'तारक मेहता..'च्या बबिताविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या लोकप्रिय मालिकेत बबिताची Babita भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta हिच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक शब्द वापरल्यामुळे मुनमुनविरोधात मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याआधीही तिच्याविरोधात हरयाणामधील हिस्सार इथं एफआयआर दाखल झाला होता. सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये मुनमुनने जे जातीवाचक शब्द वापरले त्याविरोधात तिच्यावर ही कारवाई झाली आहे. (case registered against taarak mehta ka ooltah chashmah actor babita aka munmun dutta for using casteist slur)

नेमकं काय आहे प्रकरण?

मुनमुनने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत बोलताना तिने जातीवाचक शब्द वापरले. याप्रकरणी सोशल मीडियावर तिच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्याचप्रमाणे तिच्या अटकेचीही मागणी केली जात होती. वाद चिघळत असल्याचं लक्षात येताच तिने नंतर सोशल मीडियावर माफीनामा सादर केला.

मुनमुन दत्ताचा माफीनामा-

'मी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. भाषेच्या मर्यादेमुळे मला त्या शब्दाबद्दलचा नेमका अर्थ माहित नव्हता. त्याबद्दल समजताच नंतर मी व्हिडीओतून तो भाग काढून टाकला होता. मी प्रत्येक जात, पंथाच्या व्यक्तींचा आदर करते. मी अनवधानाने वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते', अशी पोस्ट तिने लिहिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT