raj, celina
raj, celina 
मनोरंजन

राज कुंद्राच्या 'हॉटशॉट्स' अ‍ॅप कनेक्शनबाबत सेलिना जेटलीचं स्पष्टीकरण

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितींची निर्मिती व प्रसारणप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राला न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हॉटशॉट या अ‍ॅपद्वारे कुंद्राने अश्लील चित्रफितींचे चित्रण केले. याप्रकरणी एका मॉडेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत, अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना कुंद्राने त्याच्या अ‍ॅपसाठी विचारलं होतं असं धक्कादायक विधान केलं. यामध्ये तिने सेलिना जेटली, किम शर्मा, नेहा धुपिया, अर्शी खान, नोरा फतेही, स्कार्लेट रोझ यांची नावं घेतली होती. त्यावर आता अभिनेत्री सेलिना जेटलीच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. (Celina Jaitley clarification on Raj Kundras HotShots app slv92)

'सेलिना जेटलीला शिल्पा शेट्टीच्या जेएल स्ट्रीम या अ‍ॅपसाठी विचारण्यात आलं होतं. शिल्पाचं हे अ‍ॅप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आहे. सेलिनाला हॉटशॉट्ससाठी विचारण्यात आलं नव्हतं. तिला त्या अ‍ॅपविषयी माहितीसुद्धा नाही. शिल्पा ही सेलिनाची खूप चांगली मैत्रीण आहे आणि त्यामुळेच शिल्पाने तिला तिच्या अ‍ॅपसाठी काम करण्याविषयी विचारलं होतं. मात्र इतर कामाच्या व्यापामुळे सेलिना शिल्पा शेट्टीच्या अ‍ॅपसाठी काम करू शकली नव्हती. फक्त सेलिनाच नाही तर इतर बॉलिवूड अभिनेत्रींनाही त्या अ‍ॅपसाठी विचारण्यात आलं होतं', असं सेलिनाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली होती. हॉटशॉट या अ‍ॅपद्वारे ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या चार महिन्यांत अ‍ॅपल कंपनीकडून कुंद्राला १ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर गुगल प्लेस्टोरवरील अ‍ॅपचे त्याचे सर्वाधिक युझर्स होते. त्यातून गुगलकडून मोठा महसूल त्याला मिळाल्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी गुगलकडून माहिती मागविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT