Chahatt Khanna on linked with sukesh chandrashekhar Google
मनोरंजन

महाठग सुकेशसोबत नाव जोडल्यावर चाहतची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'योग्य वेळ आली की..'

टी.व्ही अभिनेत्री चाहत खन्ना महाठग सुकेश चंद्रशेखरला भेटायला तिहार जेलमध्ये गेली होती आणि तिला महागड्या भेटवस्तूही दिलेल्या, अशा बातम्या समोर येतायत.

प्रणाली मोरे

Chahatt Khanna on linked with sukesh chandrashekhar: मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस,नोरा फतेहीनंतर आता टी.व्ही अभिनेत्री चाहत खन्नाचं नावही समोर आलं आहे. बोललं जात आहे की,चाहत खन्ना महाठग सुकेश चंद्रशेखरला भेटायला तिहार जेलमध्ये गेली होती. आणि याबदल्यात तिला महागड्या भेटवस्तू सुकेशकडून भेट देण्यात आल्या होत्या. अर्थात आतापर्यंत यावर चाहतने मौन साधलं होतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीनं तिच्यावर लावलेल्या आरोपांवर स्पष्टिकरण देत काही वक्त्व्य केली आहेत. चला जाणून घेऊया महाठग सुकेस सोबतच्या लिंकअपविषयी काय बोलली आहे चाहत खन्ना.

सुकेश चंद्रशेखर २०० करोडच्या अफरातफरीच्या केसमध्ये तिहार जेलमध्ये बंद आहे. मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आतापर्यंत चार अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. पहिल्यांदा या केसमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची नावं समोर आली होती आणि त्यांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी आणखी दोन अभिनेत्री चाहत खन्ना आणि निक्की तंबोलीची नावंही रिपोर्ट्समध्ये समोर आली. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार कळत आहे की,जेव्हा चाहतशी यासंदर्भात बोललं गेलं तेव्हा ती म्हणाली,''मला या सगळ्या बातम्या वाचल्यावर हसायला येतंय''.

अभिनेत्रीचं म्हणणं आहे की,''मी यासंदर्भात खूप बातम्या वाचल्या,ज्यात माझं नाव सामिल आहे. बोलायला खूप काही आहे,पण मला वाटतं की मी यावर स्पष्टीकरण देत का फिरू. आता ती योग्य वेळ आली नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच मी स्पष्टिकरण द्यायला हवं, आणि मी देईनही. चाहतचं म्हणणं आहे की योग्य वेळ आल्यावरच ती या प्रकरणावर स्पष्टिकरण देईल''.

टी.व्ही अभिनेत्री चाहत खन्ना म्हणाली,''मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये माझं नाव समोर आल्यानंतर लोक जे तोंडाला येईल ते बोलत आहेत. पण आपण यानं चिंतेत नसल्याचं ती म्हणाली''. चाहत पुढे म्हणालीय,''जेव्हा मी यावर काही बोलेन,तर लोक यावर आणखी नव्या गोष्टी बनवून बोलू लागतील. त्यामुळे आता गप्प बसण्यातच शहाणपण आहे. जर मला वाटलं की यावर बोलायला हवं,ते गरजेचं आहे तेव्हा मी नक्कीच बोलेन''.

चाहतचं म्हणणं आहे की,''जर माझी बाजू समजून घेतल्याशिवाय लोक कुठल्यातरी निष्कर्षाला पोहचले आहेत,तर मी यानं दुखी नाही होणार. लोकांना सत्य काय ते माहीत नाही. म्हणूनच ते काहीही बोलत आहेत आणि केवळ ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत''. चाहत म्हणाली की, ''मी आणि माझं कुटुंब या सगळ्या बातम्या ऐकून,वाचून हसत आहोत. आम्हाला कळत नाहीय हे काय सुरु आहे आणि काय बोललं जात आहे. चाहत म्हणाली,जर मी ही केस घेऊन कुठल्या वकीलाकडे गेली तर तो सुद्धा माझ्यावर हसेल,म्हणेल हा काय बावळटपणा सुरु आहे''.

चाहतने आता आपली बाजू समोर ठेवली आहे. आता पहायचं की येणाऱ्या दिवसात या प्रकरणात नेमका कोणता खुलासा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा विक्रमी ऊस दर; राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला

IND vs AUS 4th T20I: शुभमन गिलची 'जागा' वाचवण्यासाठी संथ खेळी! सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने आवळला फास...

Latest Marathi Live Update News : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखू पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांच्या मदतीला एकनाथ शिंदे दाखल

'हा' मराठी अभिनेता उतरला निवडणुकीच्या रिंगणात? लढवणार नगरपालिकेची निवडणूक; पोस्टर शेअर करत दिली हिंट

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

SCROLL FOR NEXT