chala hava yeu dya, CHYD, kushal badrike, london SAKAL
मनोरंजन

Kushal Badrike: लहानपणी माझा हात पाहून पानवाला बोलला ते अखेर खरं झालं.. कुशलची 'ती' पोस्ट चर्चेत..

चला हवा येऊ द्या या मधून कुशलने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

Devendra Jadhav

Kushal Badrike News: अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. चला हवा येऊ द्या या शोमधून कुशलने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

आज मराठी इंडस्ट्रीतील विनोदी अभिनेता म्हटलं की चटकन कुशल बद्रिकेचं नाव समोर येतं. कुशल बद्रिकेने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलंय. कुशल बद्रिकेच्या आयुष्यात आणखी एक यशस्वी टप्पा आलाय.

हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

कुशल बद्रिके कितीही यशस्वी झाला तरीही तो आपली मुळं विसरला नाहीये. कुशलने एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेयर केलीय. या पोस्टमध्ये कुशलने एक खास आठवण शेयर केलीय.

कुशल लिहितो.."मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. 120/300 कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस.

लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे “मी” देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला….. “साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना… देस बिदेस घुमेगा !"

कुशल पुढे लिहितो.. "लहानपणी, कन्नी कापलेल्या पतंगा मागे “उरफाटेस्तोवर” धावणाऱ्या मला, माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे “उरफाटेस्तोवर” धावायला लावलं नाही,

आणि झाडाला “व्हलटा” (छोटी काठी) मारून हवी असलेली “कैरी” पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही, हवी असलेली “स्वप्न“ पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही.

जे जसं होत गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून “प्रामाणिकपणाची शिदोरी” तेवढी मिळाली होती ती मात्र ह्या प्रवासात कामी आली. आणि अजूनही येते.

आई - बाबांविषयी कुशल पुढे सांगतो.. "माझ्या आई-बाबांनी, अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करुन घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून, माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही, म्हणून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालोय.

आज पुन्हा मी लंडन च्या प्रवासाला निघालोय….. नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलय मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या १२०/३०० पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की." अशी पोस्ट कुशलने लिहिली आहे.

कुशल आता लंडनला जाऊन अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोबत शूटिंग करणार आहे. कुशल आणि प्रार्थना नेमकं कोणत्या सिनेमाचं शूटिंग करणार हे अद्याप कळू शकलं नाही. पण कुशलची हि पोस्ट वाचून अनेकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT