Bhau Kadam  Instagram
मनोरंजन

Bhau Kadam घरी आला अन् घरच्या कुत्र्यानं थेट..., व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमनं आपल्या लाडक्या डुग्गु कुत्र्यासोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Bhau Kadam:सेलिब्रिटी आणि त्यांचे प्राणी प्रेम आपल्याला काही नवीन नाही. असे अनेक सेलिब आहेत ज्यांचे पेट डॉग आणि कॅट हे त्यांच्याप्रमाणेच प्रसिद्धिच्या झोतात येतात. अनेकदा सेलिब्रिटी आपल्या घरच्या पाळीव प्राण्यांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसतात.

असाच एक व्हिडीओ 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमचा व्हायरल होताना दिसत आहे ,ज्याच्यात तो त्याच्या डुग्गु सोबत म्हणजे घरच्या त्याच्या लाडक्या कुत्र्यासोबत खेळतना दिसतोय. पण या मध्ये भाऊच्या या डुग्गुने त्याच्यासोबत अशा काही मजेदार हरकती केल्या आहेत ज्यामुळे त्या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसत आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम त्याच्या वेगवगेळ्या मजेदार स्कीट्समधनं चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करताना दिसतो. त्याने साकारलेल्या स्त्री व्यक्तीरेखा अनेकदा प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडतात.

सोशल मीडियावर देखील तितकाच नेटकऱ्यांचा चाहता आहे. त्यानं पोस्ट केलेले फोटो-व्हिडीओ त्यामुळेच काही वेळातच व्हायरल होतात. भाऊनं नुकताच त्याच्या घरच्या कुत्र्यासोबत ..त्याच्या लाडक्या डुग्गुसोबत शेअर केलेला व्हिडीओ म्हणूनच भाव खाऊन गेला आहे. यात शूटिंगंमधनं थकून भागून आलेल्या भाऊसोबत त्याचा कुत्रा मस्त खेळताना दिसतो.

तो भाऊचे लाड करतोय असं व्हिडीओ पाहून अनेकांचे म्हणणे पडले आहे. असे पाळीव प्राणी घरी असले की कामाचा क्षीण क्षणात दूर पळतो असं देखील एका नेटकऱ्यानं भाऊ कदमच्या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटलं आहे.

.

भाऊनं आपल्या डुग्गुसोबत म्हणजे लाडक्या डॉगीसोबत खेळतानाच्या शेअर केलेल्या व्हिडीओवर काही भन्नाट कमेंट्स देखील चाहत्यांनी केल्या आहेत..कुणीतरी लिहिलंय,''भाऊ,तो म्हणतोय एकदा शांताबाई करुन दाखवा की..'', तर कुणी एकानं लिहिलंय,''भाऊ ते कुठेही धरील बरं..तुमच्या 'पांडू' सिनेमात दाखवलंय तसं..''हा व्हिडीओ पोस्ट करत भाऊ कदमनं देखील लाडक्या डफ्फूचं नाव लिहित हार्ट इमोजी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात शिक्षकांची रिक्त पदे, बी.एल.ओ नेमणूकीने शिक्षणाचा खेळखंडोबा

Muddy Water Supply : शिरूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; पाणी इतके घाण कि आंघोळही करणे टाळले

Junnar News : पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला आले यश

शाळेत निघालेल्या ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार! नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, फिर्यादी असलेल्या पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

SCROLL FOR NEXT