Chandrachud Singh  esakal
मनोरंजन

Chandrachud Singh : अभिनेता होण्यासाठी भावानं UPSC सोडली, स्वप्न पूर्ण केलचं!

कुणी काही म्हणेना त्या अभिनेत्यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याला तू हिरो होशील असं कुणी म्हटलं असते तर ते खरं ठरलं नसतं.

सकाळ डिजिटल टीम

Chandrachur Singh UPSC Exam Accident bollywood : कुणी काही म्हणेना त्या अभिनेत्यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याला तू हिरो होशील असं कुणी म्हटलं असते तर ते खरं ठरलं नसतं. त्यावरुन जे कुणी हे बोललं त्याला वेड्यात काढले असते. मात्र चंद्रचूड सिंहन आपण वेगळेच असून आपल्याकडे काय क्षमता आहे हे दाखवून दिलं.

ज्यांनी शाहरुख आणि चंद्रचूडचा जोश पाहिला असेल त्यांना तो कशा धाटणीचा अभिनेता आहे कळून जाईल. गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला माचिस चित्रपटही चंद्रचूडची वेगळी ओळख आहे. त्यानंतरही त्यानं बऱ्याच चित्रपटामध्ये कामं केली. वेबसीरिजमध्येही तो चमकला. एकुणच चंद्रचूडची बॉलीवूडमधील ओळख वेगळीच होती. त्यानं स्वताचे वेगळेपणही जपले ही जास्त महत्वाची बाब म्हणावी लागेल.

Also Read -manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

असं म्हटलं जातं की, चंद्रचूडनं युपीएससीची तयारी सुरु केली होती. त्याचा जोरदार अभ्यासही सुरु होता. पण मनातून त्याला अभिनेता होण्याची खूपच इच्छा होती. आपण चांगल्या अधिकाऱ्यापेक्षा चांगला अभिनेता नक्की होऊ असे त्याला वाटायचे. त्यात यशस्वीही झाला. वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्याला त्याच्या अभिनयासाठी गौरविण्यात आले आहे.

९० च्या दशकांतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये चंद्रचूडचे नाव घ्यावे लागेल. या अभिनेत्यानं त्यावेळच्या दिग्गज अभिनेत्यांना टक्कर देत स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता चंद्रचूड सिंह ला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी त्यानं त्याच्या मुलासोबत फोटोग्राफर्सला पोझ दिली. यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेसनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

चंद्रचूडच्या वैयक्तिक आय़ुष्याविषयी सांगायचे झाल्यास त्यानं युपीएससीच्या परिक्षा सोडून दिल्या. त्याचे करिअर जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हा मात्र ती गोष्ट घडली आणि त्याला मोठा झटका बसला. गोव्यात वॉटर स्कीइंगच्या दरम्यान त्याला अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. अजूनही त्याची फिजिओथेरपी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT