chandramukhi movie  esakal
मनोरंजन

चंद्रमुखी' च्या कान्ह्याची जादु प्रेक्षकांना भावणार? अजय-अतुलचा संगीतसाज

मराठी चित्रपट विश्वानं सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यामध्ये चंद्रमुखी या चित्रपटाचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

सकाळ ऑनलाईन टीम

Chandramukhi Movie: मराठी चित्रपट विश्वानं सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यामध्ये चंद्रमुखी या चित्रपटाचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित चंद्रमुखीमध्ये अमृता खानविलकरनं (Amruta Khanwilkar) प्रमुख भूमिका साकारली होती. तर दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुकही केलं आहे. सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी'च्या (marathi movie) घुंगरांचे बोल घुमत असून 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीमधून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. चंद्रालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले, देत आहेत. चित्रपटातील भन्नाट गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार 'कान्हा' हे गाणं आपल्या समोर भेटीला आलं आहे.

खरंतर 'चंद्रमुखी' या चित्रपटाबरोबरच, चित्रपटातील संगीतानेही सर्वांना भुरळ घातली आहे. या गाण्यात भगवान श्रीकृष्णाची भक्त असलेली चंद्रा तिच्या मनातील भावना कान्हापुढे व्यक्त करताना दिसत आहे. थेट मनाला भिडणारे हे गीत चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आले असून या गाण्याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अजय गोगावले यांनी गायलेल्या 'कान्हा' या गाण्याला गुरु ठाकूर यांचे बोल लाभले आहेत. 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. आजही 'चंद्रमुखी'साठी 'चित्रपटगृहासमोर हाऊसफुल'चा बोर्ड लागत आहे. 'चंद्रा' या शीर्षकगीताने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक जण या गाण्यावर थिरकत आहेत. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारे असे प्रेम पाहून खूप छान वाटतेय. या चित्रपटाची कथा तर दमदार आहेच. मात्र चित्रपटाचे संगीतही त्याच ताकदीचे आहे.

चित्रपटातील गाण्यांचे श्रेय पूर्णपणे संगीत टीमला जात असले तरी सादर करण्यासाठी अमृतानेही खूप मेहनत घेतली आहे आणि सगळ्यात प्रसादचा सिंहाचा वाटा आहे. 'चंद्रमुखी'वर सर्वच स्तरातून होणारा कौतुकांचा वर्षाव पाहून प्रसाद,अमृता,आदिनाथ,अजय-अतुल, एकंदरच संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे दिसत आहे. 'कान्हा' हे गाणे सध्या प्रदर्शित करण्यात आले असून इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही रसिकांना भावेल.'' अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांची पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT