prajakta mali instagram post for amruta khanvilkar  sakal
मनोरंजन

'तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चत..

'चंद्रमुखी' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलेली पोस्ट चर्चेत आहेत. यामध्ये तिने अमृता खानविलकरचे कौतुक केले आहे.

नीलेश अडसूळ

CHANDRAMUKHI : 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्या भूमिकेत प्राजक्ता माळी (prajakta mali) दिसणार असून तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजे 'चंद्रा' आणि प्राजक्ता म्हणजेच 'नैना' यांची सवाल जवाबाची लावणी सध्या भलतीच लोकप्रिय होत आहे. बऱ्याच वर्षांनी अशी सवाल जवाबाची लावणी चित्रपटात आली आहे. काल २९ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाबाबत प्राजक्ता माळीने एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. यामध्ये तिने अमृता खानविलकरचे (amruta khanvilkar) विशेष कौतुक केले आहे. या पोस्टसह प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीत एकी फोटो अपलोड केला आहे. हा फोटो 'चंद्रमुखी'च्या प्रीमियरचा आहे. या फोटोला एक खास कॅप्शन तिने दिले आहे. “चंद्रमुखी प्रिमियर, अम्मो.. अमृता खानविलकर तुझ्या आयुष्यातला हा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट आणि तू त्यात अप्रतिम काम केलं आहेस. तुझा हा कधीच न पाहिलेला अवतार. यासोबतच तू आता एक बेन्चमार्क सेट केलं आहेस की चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आपण किती मेहनत केली पाहिजे. तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत प्रणाम, चंद्रमुखीवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा धो धो वर्षाव होवो ह्याच शुभेच्छा...”

या कौतुकामागे कारणही खास आहे. आजवर झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये चंद्रमुखी हा सर्वाधिक प्रमोशन केलेला चित्रपट ठरला आहे. अमृता खानविलकरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली. अगदी गावागावात फिरण्यापासून विमानतळावर नाचण्यापर्यंत सर्व स्तरावर हे प्रमोशन झाले. एकही माध्यम असे नाही जिथे अमृता पोहोचली नाही. तिची अडीच वर्षांची ही मेहनत आहे. 'चंद्रा'ला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिने विशेष कष्ट घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग 7व्या दिवशी सोन्याचा भाव घसरला! सोनं तब्बल 7,200 रुपयांनी स्वस्त! आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके रुपये

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा फोन, काळे झेंडे अन् घोषणाबाजी; तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परभणीचा मेळावा घेतला

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT