Fraud News Esakal
मनोरंजन

Fraud News: 'कार्तिक आर्यन सोबत काम मिळणार' आमिषाला बळी पडली अन् झाली लाखोंची फसवणुक

Vaishali Patil

Fraud News: मुंबईला मायानगरी म्हणतात. दरदरोज अनेक लोक इथे नवनवीन स्वप्न घेवुन येतात. त्यात बरेच कलाकार मंडळीही कामाच्या शोधात येत असतात.

चित्रपटात काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असचं स्वप्न उराशी बाळगून एक तरुणी आली मात्र खोटी आश्वासन देवुन तिला लाखोंचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

बॉलिवूडस्टार कार्तिक आर्यन यांच्या सोबत ओळख करुन देईल आणि अभिनेत्री म्हणुन कामही मिळवून देईल असे अनेक आश्वासन तिला देण्यात आले.

त्याचबरोबर फिल्म प्रोड्युस करण्याची संधी देण्याचे आमिषाने मुंबईतील तरुणीची तब्बल 82,75,000 रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कार्तिक आर्यन यांच्या लव इन लंडन चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम देतो असं देखील तिला सांगण्यात आलं होतं.

आता या प्रकरणी तरुणीने मुंबईतील आंबोली पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव कृष्णा शर्मा आहे.

आरोपी कृष्णा शर्मा आणि तक्रार करणारी तरुणी हे एकमेकांच्या ओळखत होते. त्याने तिला सांगितले की, तो स्वत:फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असून त्यांची अनेक मोठे कलाकार आणि निर्मात्यांसोबत ओळख आहे.

तिची आणि कार्तिकची भेट घालुन देईल आणि त्याच्या आगामी लव इन लंडन या चित्रपटात कामही मिळवुन देईल असं सांगत कृष्णाने तरुणीचा विश्वात संपादित केला .

त्यानंतर तिला फिल्म प्रोड्युस करण्याची जबाबदारी देणार असल्याचं सांगत काही आथिर्क जबाबदारी घेण्याचे सांगितले आणि तिच्याकडून 82,75,000 एवढी रक्कम काढली.

मात्र त्याने दिलेले आश्वासन हे आश्वासनच राहिले त्याने तसं काहीच केलं नाही. ना कार्तिकची भेट झाली ना चित्रपट मिळाला. तरुणीने त्याच्याकडे पैसे परत मागितले. मात्र अद्यापही त्याने पैसे दिले नसल्याने तिने पोलिसात त्यांची तक्रार दाखल केली.

कृष्णा शर्मा विरोधात मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात पोलिसांनी भादवी कलम 406 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस कृष्णाचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT