chhava actress Rashmika Mandanna praise vicky kaushal as maharaj vicky reply viral drj96 SAKAL
मनोरंजन

Chhava Movie: 'छावा'चं शुटींग संपल्यावर रश्मिका भावूक, विकीचा 'महाराज' उल्लेख करत म्हणाली...

रश्मिका मंदानाने संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकीसाठी खास पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

Vicky Kaushal - Rashmika Mandanna Chhava Movie: विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विकी या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय सिनेमात येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारत आहे.

'छावा'मधील रश्मिकाच्या सीन्सचं शुटींग पूर्ण झालं असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करत विकीचा 'महाराज' असा उल्लेख केलाय.

रश्मिका मंदानाने विकी कौशलचे कौतुक केले

रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने विकी आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला.

रश्मिका लिहीते, "विकी 'महाराज..' तुझ्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. तू खूप प्रेमळ आणि दयाळू आहेस. तू माणूस म्हणून एक हिऱ्यासारखा आहेस. मी तुझ्यासाठी नेहमीच सदिच्छा देईन. खूप आनंद झाला. आईने मला तुला शुभेच्छा देण्यासाठी सांगितले आहे," तिने लिहिले.

रश्मिकाने पुढे लिहीले, "रश्मिका neen yennane ullia? संपूर्ण सेट तुझी एनर्जी मिस करतंय. तुझ्या सर्वात वाईट दिवसांमध्ये तु केलेलं स्मितहास्य मी कधीच विसरणार नाही. तू आमची मुख्य प्रेरणा आहेस! येसूबाईंची भूमिका साकारल्याबद्दल धन्यवाद. आणि मावशीलाही माझा नमस्कार."अशा शब्दात विकीने रश्मिकाचं कौतुक केलंय.

छावा सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज तर रश्मिका येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. हा सिनेमा यावर्षी भेटीला येण्याचा शक्यता असून सध्या सिनेमाचं शूटींग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT