Chhavi Mittal On Trolls esakal
मनोरंजन

Chhavi Mittal On Trolls: 'माझ्याच मुलांना किस केलं, एवढं काय झालं?'

अरे ला का रे करण्याची ती भूमिका अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chhavi Mittal On Trolls : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल ही नेहमीच तिच्या परखड स्वभावामुळे चर्चेत असते. अरे ला का रे करण्याची ती भूमिका अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. आता छवि ज्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांना तिनं जशास तसे उत्तर दिले आहे.

छवीला यापूर्वी देखील अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याचे कारण तिचा आक्रमक स्वभाव. त्याचे झाले असे की, छवीनं तिच्या मुलांना किस केलं. त्या किसिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी तिला प्रतिक्रिया देताना पातळी सोडून केलेल्या कमेंट्स यामुळे छवीचा संताप झाला आहे. तिनं देखील कोणतीही पर्वा न करता ट्रोल करणाऱ्यांना कडक शब्दांत उत्तर दिले आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

छवीनं इंस्टावरुन काही फोटो पोस् केले होते त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. मुलांना कुणी लिप लॉक किस करतं का असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. याशिवाय एकानं कमेंट केली आहे की, तुम्ही जो फोटो पाहत आहात त्याच्याकडे पाहू नका. त्याला लाईक करु नका. आपल्या मुलांना अशाप्रकारे किस करणं हे चुकीचं आहे. हे म्हणजे मुलांचे शोषण केल्यासारखे आहे. अशा प्रतिक्रिया त्या फोटोंवरुन व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. यावर छवीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

छवीनं त्या संबंधित नेटकऱ्याच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. आता तर आईलाच आपल्या मुलांवर कसे प्रेम करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही गोष्टींची तर कल्पनाच करवत नाही. लोकं कशावरुनही वाद तयार करतात. ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी तो माणूसकीच्या नात्यानं केला आहे. आता मी माझ्या मुलांना किस केलं यात गैर काय, मी लोकांसाठी माझ्या प्रेमाच्या सीमारेषा कशा ठरवू, अशा शब्दांत छवीनं उत्तर दिलं आहे.

लोकांनी मला सांगावं का प्रेमाची व्याख्या काय आहे ते, पालकांनी मुलांवर कसे प्रेम करायचे याचेही धडे नेटकरी देणार का, कशावरुनही बोलायचं, ट्रोल करायचं याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आई वडिलांच्या भूमिकेत असताना प्रेमाची व्याख्या आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल असेही छवीनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT