Scoop Web Series chhota rajan moves high court seeking stay on release of scoop web series netflix butCourt refuses relief to Chhota Rajan  Esakal
मनोरंजन

Scoop Web Series: छोटा राजनला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली

Vaishali Patil

हंसल मेहता यांची नवीन वेब सीरिज 'स्कूप' ही सिरिज आज रिलिज झाली आहे. करिश्मा तन्ना या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. मात्र या सिरिज विरोधात छोटा राजन याने कोर्टात याचिका दाखल केली होती.

या वेबसिरिज विरोधात याचिका दाखल करणार्‍या आणि सध्या तुरुंगात बंद गँगस्टर राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती एस जी डिगे यांच्या खंडपीठाने हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह सिरिजच्या निर्मात्यांना 7 जूनपर्यंत राजनच्या याचिकेला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.

तुरुंगात असलेल्या राजनने गुरुवारी वेब सीरिजच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यात त्याने म्हटले होते की मालिकेच्या प्रदर्शनावर बंदी घालावी आणि ट्रेलर काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांने न्यायालयाला केली.

त्याने हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह सिरिजच्या निर्मात्यांना त्याच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेशाची मागणी केली.मात्र आता कोर्टानं त्याची याचिका फेटाळली आहे.

ही मालिका प्रदर्शित झाली आहे आणि सर्व सहा भाग उपलब्ध असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली तेव्हा राजनचे वकील मिहिर देसाई म्हणाले की, निर्मात्यांना मालिकेतून त्याचे नाव आणि प्रतिमा काढून टाकण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.

न्यायमूर्ती डिगे यांनी मात्र राजन यांना दिलासा देणारा कोणताही आदेश देण्यास नकार दिला. 'सिरिज आधीच रिलीज झाली आहे. सर्व भाग प्रकाशित झाले आहेत. पुढच्या तारखेला बघू. सर्व प्रतिवादींकडून उत्तर प्रतिज्ञापत्र दाखल करू द्या. ७ जून रोजी या प्रकरणाची यादी करा,' असे न्यायालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

SCROLL FOR NEXT