Chinmayi Sripaada criticizes MK Stalin, Kamal Haasan, P Chidambaram for 'honouring' 'Me Too' accused Vairamuthu Esakal
मनोरंजन

Chinmayi Sripaada: कमल हासन अन् तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर गायिकेचा संताप! नेमकं प्रकरण काय? पोस्ट व्हायरल

चिन्मयीने दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याबरोबरच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह काही नेत्यांवर टीका केली आहे.

Vaishali Patil

singer chinmayi sripada on kamal haasan: साऊथची सुप्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा नेहमी तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इंडस्ट्रीशी संबधित अनेक मुद्द्यांवर ती खुलेपणाने आपले मत मांडत असते. Me Too चळवळीच्या काळात तिची खुप चर्चा झाली. त्यावेळी तिने खुलेपणाने यावर भाष्य केले होते.

त्यादरम्यान तिने लैंगिक छळाचे धक्कादायक आरोप केले होते आणि कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा चिन्मयी श्रीपदा चर्चेत आली आहे. आता पुन्हा तिने दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह काही नेत्यांवर टीका केली आहे.

चिन्मयीने तिच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेयर केला जो प्रसिद्ध तमिळ चित्रपट गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथु यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला होता.

या फोटोमध्ये कमल हासन यांच्या सीएम एमके स्टॅलिन आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम वैरामट्टू देखील स्टेजवर होते.

या पोस्टमध्ये तिने लिहिले, 'ज्याने माझा विनयभंग केला त्याच्यासोबत तामिळनाडूचे सर्वात शक्तिशाली लोक उभे आहेत आणि दुसरीकडे, माझ्यावर बंदी घालण्यात आली. माझं करियर संपवलं. आशा आहे की गुन्हेगारांना पाठिंबा देणारी आणि प्रोत्साहन देणारी आणि प्रामाणिक लोकांना बांधून ठेवणारी संपूर्ण इको सिस्टम नष्ट होईल . माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मी प्रार्थना करीन आणि प्रार्थना करत राहीन. याशिवाय मी काहीही करू शकत नाही.'

चिन्मयीने कमल हासन यांच्यावर यापुर्वीही टीका केली आहे. काही महिन्यापुर्वी जेव्हा कुस्तीपटूंच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल कमल हासन यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेयर केली होती त्यावेळी कमल हासन यांच्यावर तिने टीका केली होती.

2018 मध्ये चिन्मयीने वैरुमुट्टू वर गंभीर आरोप केले होते. भारतात जेव्हा #MeToo चळवळ सुरू झाली तेव्हा चिन्मयीने वैरामुथू यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र त्याच्यावर काही कारवाई करण्यात न आल्याने चिन्मयी नेहमी याविषयी पोस्ट शेयर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT