Chitrangda Singh slams airline company. Google
मनोरंजन

'आधी Air India आता Go Air'; स्टाफला शिष्टाचार शिकवा; चित्रांगदा भडकली

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत सांगितला विमानतला वाईट अनुभव.

प्रणाली मोरे

अभिनेत्री चिंत्रागदा सिंग(Chitrangda Singh) अनेक दिवसांनी चर्चेत आली ती सिनेमामुळे नाही तर एका वादामुळे. आणि तिचा हा वाद थेट झालाय तो 'गो एअर' या विमान कंपनीसोबत. तिनं त्या कंपनीच्या एअरहोस्टेस विरोधात सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित त्यांच्या कानशिलातच वाजवलीय थेट शब्दांच्या माध्यमातून. ती ज्या फ्लाइटमधनं ट्रॅव्हल करत होती त्यातील एअरहोस्टेसची थेट नावं घेत त्यांना जरा शिष्टाचार शिकवा असं सांगणारी पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. या एअरहोस्टेस अत्यंत उद्धटपणे बोलल्या,आणि आपण या त्यांच्या वागण्यानं अत्यंत निराश झालेले आहोत असंही तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तिनं त्या विमानातलं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यात तिनं आपल्या फोनचा कॅमेरा एका एअरहोस्टेसच्या दिशेनं रोखला आहे आणि तिनं लिहिलंय,''फ्लाइट नं ३९१ गो एअर,मुंबई-दिल्ली@g8.goair या फ्लाइटमधील एअरहोस्टेस अत्यंत उद्धट बोलणाऱ्या होत्या,आतापर्यंतच्या विमानप्रवासातला हा अत्यंत वाईट अनुभव. आणि तिनं त्या एअरहोस्टेसची थेट नावं त्या पोस्टमध्ये लिहिली आहेत. तिनं कपंनीला उद्देशून लिहिलं आहे की,आपल्या एअरहोस्टेसना कसं बोलायचं,वागायचं शिकवा.शिष्टाचार एअरहोस्टेसला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. मी एअरहोस्टेसचं असं बोलणं-वागणं पहिल्यांदाच अनुभवतेय. यांनी मला एअर इंडिया (Air India) कंपनीसोबतच्या विमानप्रवासातील त्या वाईट अनुभवाची आठवण करून दिली''.

Chitrangda Singh Instagram post Image

पुढे तिनं लिहिलं आहे की,''विमानात माझ्यासोबत हा प्रसंग झाला नाही पण माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या एका विमान प्रवाशासोबत हा प्रसंग घडला आहे. तो मनुष्य इतक्या अदबीनं,शांतपणे त्या ए्रअरहोस्टेसशी बोलत होता पण त्या मात्र खूप अॅटिट्युड आणि उद्धटपणाने त्याच्याशी वागल्या. जे खरं तर खूप चुकीचं आहे. एअरहोस्टेसकडून अशा बोलण्याची अपेक्षा कधीच केली जात नाही''. आता कंपनी या पोस्टमुळे त्या एअरहोस्टेसवर काय अॅक्शन घेतेय हे पहायचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT