mayur 
मनोरंजन

कोरिओग्राफर मयूर वैद्यने गुरु पं. बिरजु महाराज यांना 'थुँग थुँगा' गाण्यावर वाहिलं नृत्यपुष्प.. पहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- कोविड-१९च्या संकटाचा सामना करण्यासाठी सारीच मंडळी लॉकडाऊनमध्ये आहेत. या लॉकडाऊनचा चांगला वापर करून घेण्याचा प्रयत्न अनेक सेलिब्रिटी मंडळी सुद्धा करत आहेत. आपले छंद जोपासण्यासाठी काहींनी किचनचा तर, काही मंडळींनी घरातील जिम आणि योगा यांचा मार्ग निवडला आहे. सध्या सगळेच सेलिब्रिटी घरात असल्यामुळे जीमला जाणं खूप मिस करत आहेत..त्यामुळे घरातंच फिट राहण्यासाठी घरातल्याच गोष्टींंचा उपयोग करुन फिटनेस राखण्याचा प्रयत्न करत आहेत..कोरिग्राोफर मयूर वैद्य देखील याला काही प्रमाणात अपवाद आहे. छंद आणि फिटनेस यांचा योग्य मेळ साधत तो नृत्याचा रियाज करत असल्याचं दिसून येतंय..

मयूर वैद्य आणि कथ्थक हे समीकरण सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेच्या निमित्ताने मयूर परीक्षक म्हणून घराघरात पोचला. सर्व स्पर्धकांप्रमाणेच मयूर सुद्धा प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. त्यामुळेच, लॉकडाऊनच्या काळात मयूर काय करतो? हे जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांना आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मयूर त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेच. कथ्थकचा रियाज करत असतानाचा त्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना मयुरने लिहिलंय, ''आपण दैनंदिन जीवनात इतके व्यस्त असतो की कधी कधी स्वता:लाच हरवुन बसतो. पण हया क्वारंटाईनमध्ये प्रत्येकाने स्वता:ला शोधल्याचं सुंदर चित्र सध्या पहायला मिळत आहे. माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे. नृत्याच्या पलीकडे जाऊन मी वेगळा विचार करणं माझ्यासाठी जरा कठीणच गोष्ट आहे. हया नृत्याच्या प्रवासात एक गोष्टं मात्र कायम आहे ती म्हणजे विद्यार्थी वृत्ती. सतत काहितरी शिकण्याची आवड आजही कायम आहे. हया क्वारंटाईनमध्ये मी माझ्या गुरुंना खुप जास्त मिस करतो आहे. माझे गुरु म्हणजे ‘पद्मविभूषण पंडित बिरजु महाराजजीं’.. गेली २१ वर्ष त्यांच्या बरोबर राहण्याचा योग हा माझ्या मावशींमुळेच मिळाला. त्यांच्या छत्रछायेखाली शिकणे हे माझं सौभाग्यच. त्यांनी ही मला विद्यार्थी म्हणुन स्विकरालं हे माझं अहोभाग्य. वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा महाराजजी कथक नृत्याच्या माध्यमाने अनेक गावात, शहरात व परदेशात जाऊन नृत्याचे धडे देत आहेत. आत्ताच त्यांचा एक स्वलिखित गाण्यांचा अल्बम प्रकाशित झाला. त्यामध्ये अनेक प्रतिभावान गायकांनी गाणी गायली असुन त्यामधील माझं आवडतं गाणं आहे त्यांनीच गायलेलं ‘थुँग थुँगा’. मनात आलं की हेच गीत त्यांना मी माझ्याच नृत्यपुष्पातून वाहीलं तर? ही अनोखी भेट माझ्या गुरुंना मी आज देत आहे माझ्या नृत्य दिग्दर्शनातुन. तुम्हीं मात्र घरातच राहा आणि आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या..''

त्याच्या नृत्यातील साज, चाहत्यांसह सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. 'कुठल्याही गोष्टीत निपुण होण्यासाठी, रियाज अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यायला हवी' असा संदेश सुद्धा त्याने या विडिओमध्ये दिला आहे. कथ्थकमधील विश्वरत्न असूनही अधिकाधिक निष्णात होण्यासाठी नियमित रियाज करत असलेल्या मयूरचं खूप कौतुक होत आहे..  

choreographer mayur vaidya doing katthak riyaz in lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT