chota bheem movie teaser anupam kher makrand deshpande in lead role  SAKAL
मनोरंजन

Chota Bheem Teaser: छोट्या पडद्यावर गाजलेला छोटा भीम आता सिनेमात दिसणार, टीझर एकदा पाहाच

टीव्ही वर गाजलेला छोटा भीम आता सिनेमात दिसणार आहे

Devendra Jadhav

छोटा भीम हे कार्टून कोणी पाहिलं नाही असा माणुस आढळणं कठीण. छोटा भीम कार्टून प्रचंड गाजलं. छोटा भीम, राजू, छुटकी अशा व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या.

आता टीव्ही आणि छोट्या पडद्यावर गाजलेला हा छोटा भीम मोठ्या पडद्यावर येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. छोटा भीम आता सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचा टीझर नुकताच भेटीला आलाय.

(chota bheem movie teaser)

छोटा भीम सिनेमाची घोषणा

'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्यान' हा अॅनिमेटेड चित्रपट दशकापूर्वी प्रदर्शित झाला होता. आता निर्मात्यांनी या सिनेमाची लाइव्ह-अॅक्शन आवृत्तीची घोषणा केली आहे.

या चित्रपटात अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बुधवारी, 13 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्यान'चा टीझर आऊट

'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्यान' या थेट-अ‍ॅक्शन चित्रपटात अनुपम खेर गुरु शंभूच्या भूमिकेत, मकरंद देशपांडे स्कंधीच्या भूमिकेत आहेत, तर यज्ञ भसीन छोटा भीमची मुख्य भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात चुटकीच्या भूमिकेत आश्रिया मिश्रा आणि टुनटुन मौसीच्या भूमिकेत सुरभी तिवारी आहे. राजीव चिलाका यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, ज्यांनी 2012 च्या मूळ अॅनिमेटेड चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४ मध्ये मे महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT