Chowk marathi movie Trailer out pravin tarde and hindustani bhau cast sanskruti balgude directed by devendra gaikwad sakal
मनोरंजन

Chowk Trailer: प्रवीण तरडे आणि हिंदुस्तानी भाऊ एकाच मंचावर, 'चौक'च्या ट्रेलर म्हणजे निव्वळ थरार..

'चौक' चित्रपटाच्या ट्रेलरनं सर्वांनाच वेड लावलंय..

नीलेश अडसूळ

Chowk Trailer: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार...’ या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे, आणि आता ‘चौक’ चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताक्षणीच सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’!

(Chowk marathi movie Trailer out pravin tarde and hindustani bhau cast sanskruti balgude directed by devendra gaikwad)

या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळेल. वास्तववादी चित्रण आणि अगदी रोज आपल्या अजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि कानावर पडणारे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे, असे ट्रेलरवरून लक्षात येते.

यासोबतच संगीतकार साई-पियुष यांचं उत्कंठावर्धक पार्श्वसंगीतावरून या चित्रपटाचे वास्तव लक्षात येते. चित्रपटाचा विषयच ‘चौक’ असल्याने यात अनेक आऊटडोअर लोकेशन्स दिसत आहेत, अगदी बारकाईने आणि सुंदर पद्धतीने या लोकेशन्सचा वापर करण्याता आला आहे, ट्रेलरमधील या गोष्टींमधून चित्रपटाची उच्च निर्मितीमूल्यं दिसून येत आहेत.

hindustani bhau chowk trailer launch

‘चौक’च्या या झंझावाती ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, (pravin tarde) उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक आणि भूमिका, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे या नव्या पिढीतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळतो.

तर स्नेहल तरडेंमधील संवेदनशील स्त्री, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाची पकड, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड हिचा कौतुकास्पद अभिनय, याशिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची चित्रपटातील विशेष भूमिका या सगळ्याचाच चित्रपटावर खोलवर परिणाम झालेला दिसतो.

चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थित दणक्यात पार पडला. यावेळी चौक चित्रपटातील कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’मध्ये वेलकम करणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं.

हिंदुस्थानी भाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपटाचे निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आले. ‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे.’ असं मत हिंदुस्थानी भाऊने व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी किरण गायकवाडने डिजे होत सर्व पत्रकारांना आणि मान्यवरांना आपल्या संगीताच्या तालावर नाचवलं!

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक १९ मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT