will smith and chris rock google
मनोरंजन

Oscars 2022 : कानाखालीचे उत्तर लवकरच देईन.. विल स्मिथने लगावलेल्या कानाखालीवर ख्रिस रॉकची प्रतिक्रिया

ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ याने होस्ट ख्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली होती. या प्रकारानंतर ख्रिस मात्र गप्प होता. अखेर त्याने मौन सोडले असून लवकर या कानाखालीचे उत्तर देईन, असे तो म्हणाला आहे.

नीलेश अडसूळ

Oscars 2022 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा यंदाच्या ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिस येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पारितोषिकांचे वितरण सुरु असतानाच मोठा राडा झाला. हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ (will smith) याने कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक (chris rock) यांच्या कानाखाली मारली होती. रॉक याने विल स्मित यांच्या पत्नीवर विनोद केल्याने विल स्मिथ यांचा संताप अनावर झाला आणि स्मित यांनी मंचावर येऊन रॉक यांना मारले. या प्रकाराने ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागले.

या घटनेबाबत ऑस्कर पुरस्कार आयोजित करणाऱ्या 'द अकॅडेमी'नेही हे चुकीचे कृत्य असल्याचे जाहीर केले होते. तसेच कारवाई करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. भर कार्यक्रमात एका कलाकाराला अशा पद्धतीने कानाखाली मारणे हे अत्यंत निंदनीय होते. या प्रकारावर टीका झाल्यानंतर अभिनेता विल स्मिथ याने माफीनाफा जाहीर केला होता. विल स्मिथने लिहीले, “माझ्या कामावर विनोद करणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. परंतु, जेडाच्या मेडीकल स्थितीबद्दल केलेला विनोद मी सहन करु शकलो नाही मी ती माझी भावनिक प्रतिक्रिया होती. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागू इच्छितो. मी चुकीचा होतो. मला माझ्या कृत्याची लाज वाटते आहे. या प्रेमळ आणि दयाळू जगात हिंसेला कुठलेही स्थान नाही.”

विल स्मिथने माफी मागितल्या नंतर ख्रिस रॉक त्यावर प्रतिक्रिया देईल असे चाहत्यांना वाटत होते. परंतु त्यानंतर त्याने अनेक विनोदाचे कार्यक्रम सादर केले परंतु कुठेही त्यांने ऑस्कर मधील घटनेचा उल्लेख केला नाही. अखेर काल झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मौन सोडले. बोस्टनमधील एका स्टँडअप शोमध्ये ख्रिसने याविषयी भाष्य केले. यावेळी त्याने मंचावर येताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे स्वागत केले. यानंतर काही वेळाने त्याने उपस्थितांशी संवाद साधला आणि ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने लगावलेल्या कानाखालीचा उल्लेख केला. ख्रिसने प्रेक्षकांना सांगितले की, 'जे झालं त्याबद्दल मी भाष्य करण्यासारखे माझ्याकडे काही नाही, त्यामुळे जर तुम्ही त्या घटनेबद्दल ऐकण्यासाठी आला असाल तर त्यासाठी माझ्याकडे एक पूर्ण शो आहे जो मी या विकेंडच्या आधी लिहिला आहे,' असे विधान करून पुढे ख्रिस म्हणाला....

“जे काही घडलं ते मी अजूनही पचवत आहे. एखाद्या क्षणी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी याबद्दल बोलेन आणि ते गंभीर आणि तितकंच मजेदार असेल,'.असे मनोगत ख्रिसने प्रेक्षकांसमोर मांडले. त्यामुळे विल स्मिथच्या कृत्यावर लवकरच चोख उत्तर मिळणार असे दिसते आहे.

काय घडले होते?
ऑस्कर सोहळ्यात सूत्रसंचालन करताना ख्रिस रॉक याने अभिनेता विल स्मिथच्या याच्या पत्नीची म्हणेजच जेडा पिंकेट हिची खिल्ली उडवली. ख्रिस रॉक हा विनोदवीर असल्याने त्याच्यासाठी ते स्वाभाविकच होते. परंतु या विनोदानंतर विल स्मिथने रागात मंचावर जाऊन ख्रिस यांच्या कानशिलात लगावली. जेडा पिंकेट हिच्या टक्कल असण्यावरून रॉक ने केलेला विनोद पती स्मिथ याला आवडला नाही. जेडाने एका आजारामुळे केस काढले असून त्यावर ख्रिस रॉकने विनोद केल्याने विल स्मिथ भडकला. यावर आयोजकांकडून कारवाईची भूमिका घेतल्यानंतर विल स्मिथ याने माफी मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT