CID Actor Death Update- Aditya Singh Rajput Last Post Viral Instagram
मनोरंजन

CID Actor Death Update: 25 वर्षीय आदित्य सिंग राजपूतची शेवटची पोस्ट व्हायरल.. मित्रांसोबतची अखेरची भेट चर्चेत

सोमवारी २२,2023 मे रोजी दुपारी घराच्या बाथरुममध्ये आदित्य सिंग राजपूतचा मृतदेह सापडला.

प्रणाली मोरे

CID Actor Death Update: 'स्प्लिट्सव्हिला' आणि 'गंदी बात' फेम अभिनेता आदित्य सिंग राजरपूत याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे, तो केवळ पंचवीशीतला होता. सोमवारी २२ मे रोजी दुपारी घराच्या बाथरुममध्ये त्याचा मृतदेह सापडला.

शंका व्यक्त केली जात आहे की त्याचा मृत्यू ड्र्ग्सचे जादा सेवन केल्यानं झाला असावा. पण अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट येणं बाकी आहे, तो आल्यावरच कारणाचा खुलासा होईल. यादरम्यान आदित्यचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,जो त्यानं जवळपास १७ तास आधी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

त्याची मैत्रिण स्वीटी वालियानं देखील त्यांच्यात शेवटचं बोलण कधी झालं आणि काय झालं याविषयी खुलासा केला आहे. (CID Actor Death Update- Aditya Singh Rajput Last Post Viral)

Aditya Singh Rajput Last Photo

आदित्य सिंग राजपूतनं मृत्यूपूर्वी जवळपास १७ तास आधी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीत मित्रांसोबत बाहेर फिरायला गेल्याचा एक फोटो आहे. त्यानं मुबंईच्या निरभ्र आकाशाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'बेस्टीज सोबत संडे..फंडे..'

स्वीटी वालियानं आज तक सोबत संवाद साधत आपल्या आणि आदित्यच्या नात्याविषयी सांगितलं की,''आदित्यसोबत माझी मैत्री खूप खास होती, तो खूप हसतमुख राहणारा मुलगा होता,मोठ्यांचा कायम सम्मान करायचा. त्याच्या निधनाच्या वृत्तानं मला मोठा धक्का पोहोचला आहे''.

''काही दिवसआधी त्यानं मला मेसेज केला होता. मला दुखापत झाली होती आणि त्यानं मला वॉइस मेसेज केला होता. तुला दुखापत झालीय असं कोण म्हणतंय बरं..तू बरी होशील लवकरच. तिचा शेवटचा मेसेज होत-लवकरच घरी ये..मी तुला मॅगी करुन खायला घालीन''.

ती पुढे म्हणाली,''मला अजूनही आशा आहे की आदित्यच्या निधनाची बातमी चुकीची निघेल. मला त्याच्या निधनाचं वृत्त एक तासानंतर कळालं पण अजूनही विश्वास बसत नाहीय माझा. तो मुंबईत एकटा रहायचा. त्याचं प्राण्यांवर खूप प्रेम होतं आणि काही दिवस आधी त्यानं सात महिन्याचं कुत्र्याचं पिल्लू सांभाळायला घेतलं होतं..आता त्या डॉगीचं कसं होईल?''

आदित्य सिंग राजपूत अभिनेता,मॉडेल,फोटोग्राफर देखील होता. तो दिल्लीचा होता आणि त्यानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यानं क्रांतीवीप,मैने गांधी को नहीं मारा सारख्या सिनेमात काम केलं होतं. त्यानं जवळपास ३०० जाहिरातीत काम केलं होतं आणि स्प्लिट्सव्हिला ९ चा देखील तो भाग बनला होता. लव्ह, आशिकी, कोड रेड, आवाज सिझन ९, बॅंड बॉय सिझन ४ सारख्या शो मध्ये तो दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT