Fredricks CID Fame Actor Dinesh Phadnis Health Update Esakal
मनोरंजन

Fredricks: CID फेम दिनेशच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी खोटी! 'दया'ने केला खुलासा

दिनेश फडणीसला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या.

Vaishali Patil

Fredricks CID Fame Actor Dinesh Phadnis Health Update: 'सीआयडी' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 'फ्रेडरिक'ची भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडणीसला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे असं सांगण्यात येत होतं.

५७ वर्षीय दिनेशवर मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता फ्रेडरिक' म्हणजेच दिनेश बाबत एक नवी बातमी समोर आली आहे. 'सीआयडी' फेम दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी याने दिनेशला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.

दयानंद शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा खुलासा केला. दिनेश फडणीस याला हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे त्याने सांगितले. तो व्हेंटिलेटरवर आहे. मात्र त्याचे कारण काही औरच आहे.

दयानंद शेट्टी याने सांगितले की, 'दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल असून तो व्हेंटिलेटरवर आहे. मात्र त्याला हृदयविकाराचा झटका आलेला नाही, तो वेगळ्या आजारावर उपचार घेत आहे आणि मला त्यावर भाष्य करायला मला आवडणार नाही. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत.'

त्यामुळे आता दिनेश फडणीसला हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे. मात्र त्याला काय झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहेत दिनेश फडणीस?

दिनेश फडणीस याने CID मध्ये 'फ्रेडरिक्स' उर्फ ​​फ्रेडी या नावाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दिनेशने 'सरफरोश', 'मेला' आदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने 20 वर्षे टीव्ही शो सीआयडीमध्ये फ्रेडीची भूमिका साकारली होती.

शोमधील त्याची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली. इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेशने अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही अभिनय केलाय.

दिनेश हा आजारपणातुन ठणठणीत बरा व्हावा म्हणुन चाहते प्रार्थना करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT