CID Actress Vaishnavi Dhanraj Abused By Family Esakal
मनोरंजन

Vaishnavi Dhanraj Abused: 'सीआयडी' फेम अभिनेत्रीला मारहाण! जखमी अवस्थेत गाठले पोलिस स्टेशन

वैष्णवी धनराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vaishali Patil

CID Actress Vaishnavi Dhanraj Abused By Family: टीव्ही शो 'सीआयडी' आणि 'मधुबाला - एक इश्क एक जुनून' यासारख्या हिट मालिकांमधून आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत ओळख मिळवणारी वैष्णवी धनराज ही खुप लोकप्रिय अभिनेत्री आहे. यासोबतच तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता वैष्णवी धनराज बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

वैष्णवी धनराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती मदतीची याचना करत आहे. या व्हिडिओत वैष्णवीच्या चेहऱ्यावर आणि हातावर, शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसत आहेत. व्हिडिओत वैष्णवी सांगते की, तिला तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली आहे.

यासोबतच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने 'HELP(मदत).' असं लिहिले आहे.

वैष्णवी धनराजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र हा व्हिडिओ तिने स्वतःच्या नाही तर हिमांशू शुक्लाच्या ट्विटर (एक्स) अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वैष्णवीने तिच्यासोबत होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले आहे. वैष्णवीने खूपच घाबरलेली दिसत आहे आणि व्हिडिओ बनवताना तिने लोकांकडे मदत मागितली आहे.

वैष्णवी धनराजने तिच्यासोबत झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना सांगितले की, तिने हा व्हिडिओ पोलीस ठाण्यातून शूट केला आहे.

यात ती म्हणते की, नमस्कार, मी वैष्णवी धनराज आहे. मला आत्ता खरोखर मदतीची गरज आहे. मी सध्या काशीमीरा (मीरा रोड) पोलीस ठाण्यात असून मला माझ्या कुटुंबीयांनी मारहाण केली आहे. मला खूप मारहाण झाली आहे. मला तुमच्या सर्व मदतीची गरज आहे. मीडिया, न्यूज चॅनेल्स आणि इंडस्ट्रीतील सर्व लोक कृपया माझी मदत करा.

यात तिने तिच्या मनगटावर आणि ओठांवर असलेल्या जखमा दाखवल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

याआधीही वैष्णवी धनराजबाबत अशा बातम्या समोर आल्या आहेत. ती यापुर्वी शारीरिक अत्याचाराला बळी पडली आहे. वैष्णवी धनराजने 2016 मध्ये अभिनेता नितीन सहरावतसोबत लग्न केले. SpotboyE ला दिलेल्या मुलाखतीत, तिने खुलासा केला होता की ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती आणि त्यामुळे तिचा घटस्फोट झाला होता.

त्यावेळी वैष्णवी धनराज म्हणाली होती की, "त्याने माझा जीव घेतला नसता, पण मी इतकी घाबरले की मी घरातून पळून गेले. त्याने मला एवढी मारहाण केली की माझ्या पायातून रक्त वाहत होतं. भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बायको म्हणुन तो माझा शेवटचा दिवस होता. मला घटस्फोट मिळाला."

आता अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीची ही अवस्था पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या प्रकरणी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT