City Of Dreams 3 promo out priya bapat atul kulkarni sachin pilgaonkar hotstar web series sakal
मनोरंजन

राजकारणात प्रामाणिकपणा फक्त कुत्र्यांनाच शोभतो.. सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?

कालपासून जोरदार सुरू आहे या विधानाची चर्चा..

नीलेश अडसूळ

City Of Dreams 3: 'प्रामाणिकपणा हा फक्त कुत्र्यांनाच शोभा देतो.. राजकारणात वेळ आली की सत्तेसाठी कुणाचे पायही दाबावे लागतात तर कुणाचा गळाही..' कालपासून या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मिडियावर सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगासारखा पसरत आहे. कारण सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

पक्षापक्षातील राजकारण, सत्तेसाठी कपडे बदलावे तसे पक्ष बदलणारे लोक आणि त्यांना खरेदी करणारे पक्ष यामुळे निष्ठा काय असते हा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर हे विधान समोर आल्याने मोठी चर्चा होत आहे. पण हा व्हिडिओ नेमका कसला आहे? हे पाहूया..

(City Of Dreams 3 promo out priya bapat atul kulkarni sachin pilgaonkar hotstar web series)

तर हा व्हिडिओ आहे आहे, बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या तिसरऱ्या सीजनचा. लवकरच हा सीझन येणार असल्याने प्रेक्षकांना त्याची प्रचंड उत्सुकता आहे. राजकारण व सत्तासंघर्षावर आधारित असलेल्या या वेब सीरिजमध्ये नेमकं काय असणार आहे? महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बाबत काही दाखवण्यात येईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोन दमदार आणि लोकप्रिय सीझन नंतर हा तिसरा सीजनही तसाच असणार आहे. त्याची प्रचिती नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मधून येते. काही दिवसांपूर्वीच 'सिटी ऑफ ड्रीम्स ३'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सीरिजच्या नवा प्रोमोही सर्वांना वेड लावत आहे.

या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर एका नेत्याच्या भूमिकेत दिसत आहेत. ते म्हणतात, 'साहेबांच्या निवृत्तीचा काही भरवसा नाही. राजकारणात प्रत्येकाला स्वत:चा विचार करावाच लागतो. पक्ष आणि साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. पण मेवा.. मेवा मात्र साहेबांच्या मुलीलाच मिळणार.'

'राजकारणात इतकं प्रामाणिक असून चालत नाही, तो फक्त कुत्र्यांनाच शोभतो.. इथे कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी येत नाही तर सत्तेसाठी येतात. मग सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागले तरी चालेल आणि गळा दाबावा लागला तरी चालेल,' असा हा व्हिडिओ आहे.

सध्या हा प्रोमो बराच चर्चेत असून या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, अतुल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिंदी व मराठी अशा दोन भाषांमध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT