मनोरंजन

प्रख्यात शास्त्रीय गायकाला जीवे मारण्याची धमकी, दोघांना अटक

शास्त्रीय गायनामध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारे गायक म्हणून उस्ताद राशिद खान यांचे नाव आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - शास्त्रीय गायनामध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारे गायक म्हणून उस्ताद राशिद खान यांचे नाव आहे. त्यांच्याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या राशिद खान यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील आघाडीचे गायक आणि संगीतकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

याप्रकरणाबाबत कोलकाता पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हा उस्ताद राशिद खान यांच्याकडे काम करणारा कर्मचारी आहे. त्यानं त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. तो आरोपी यांच्याकडे सहायक म्हणून काम पाहत होता. त्याला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे. तो खान यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला होता. पोलिसांनी सांगितलं की, या आरोपींनी राशिद खान यांच्याकडे सेफ्टीसाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी ती रक्कम कमी करत 20 लाख रुपये केली. खान यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी खान आणि त्यांच्या कुटूंबियांनी गेल्या आठवड्यात नेताजी नगरमध्ये तक्रार दिली होती. राशिद खान हे देशातील शास्त्रीय संगीत आणि गायन क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व आहे. देश- विदेशातही त्यांची लोकप्रियता मोठी आहे. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना खान यांनी सांगितले की, माझ्या मुलीनं त्या आरोपींच्या संबंधी माहिती जमवण्यास मदत केली. तिनचं सांगितलं की, ते आमचे पूर्वीचे चालक आणि सहायक आहेत. त्यांनी मला स्नायपर आणि ड्रोनच्या साह्यानं हल्ला करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणाचा तपास कोलकाता पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT