raj shilpa 
मनोरंजन

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पाला 'क्लीन चिट' नाहीच

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty) अद्याप क्लिन चीट मिळालेली नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty) अद्याप क्लिन चीट मिळालेली नाही. तिच्या पतीला राज कुंद्राला पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करुन ते शेयर करणे याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीला दिलासा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. दुसरीकडे राज आणि शिल्पा यांच्या बँक अकाउंट देखील सील करण्यात आले आहे. अशावेळी कुठल्याच बाबतीत शिल्पाला दिलासा मिळण्याची संधी दिसत नाहीये. (clean chit not yet given to shilpa shetty in raj kundra case yst88)

अश्लील चित्रपट बनवणे आणि त्याचा प्रसार करणे असा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याप्रकरणावर एकाही बॉलीवूड सेलिब्रेटींनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. सगळेजण मौन बाळगून आहेत. राजच्या मागे पोलिसांचा ससेमिरा आहे. त्याची झाडाझडती घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा कसून तपास करण्यात येतोय. याअगोदर अनेक अभिनेत्रींनी राजवर आपल्याला त्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

shilpa shetty

मुंबई पोलिसांनी अधिक माहितीसाठी न्याय़ालयाकडे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र ती मागणी कोर्टानं नाकारली आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांचे असं म्हणणं आहे की, पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीला अद्याप न्यायालयानं क्लिन चिट दिलेली नाही. तिच्याकडे सर्व बाजुनं तपास केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे शिल्पानं सुपर डान्स सारखा शो ही सोडला आहे. तिच्या ऐवजी करिश्मा कपूरनं कम बॅक केलं आहे. त्या शो मधील लोकप्रिय स्पर्धक म्हणून शिल्पाचे नाव घ्यावे लागेल. काही दिवसांपूर्वी तिचा हंगामा 2 नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा थोड्याफार प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. पतीवर झालेला आरोप आणि त्याला झालेली अटक यामुळे शिल्पाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT