club 52 marathi movie teaser SAKAL
मनोरंजन

Club 52 Teaser: पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा, हार्दिक जोशी - भाऊ कदमचा नवीन सिनेमा

हार्दिक जोशी -भाऊ कदमच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Club 52 Teaser: तुझ्यात जीव रंगला फेम राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे क्लब 52. दमदार स्टारकास्ट असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

आगळावेगळा विषय असलेल्या क्लब 52 चा टीझर भन्नाट आहे. हार्दिकसोबत सिनेमात भाऊ कदम झळकणार आहेत.

(club 52 marathi movie teaser bhau kadam hardeek joshi radha sagar)

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत "क्लब 52" या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे.

एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन "क्लब 52" या चित्रपटाला देण्यात आली आहे. टीजरवरून पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा अंदाज बांधता येतो.

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT