rajiv nigam on manish paul 
मनोरंजन

मुलाच्या दुःखद निधनानंतर कॉमेडियन राजीव निगम म्हणाले, ‘मनिष पॉल शिवाय..’

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचं निधन झाल्याचं त्यांनी सोशल मिडियावर पोस्टद्वारे सांगितलं होतं. आता राजीव यांनी एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील लोकांपैकी फक्त मनिष पॉलने मदत केली असल्याचं म्हटलं आहे.

नुकतंच कॉमेडियन राजीव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खडतर प्रवासाविषयी सांगितलं आहे. ‘खरं सांगायचं झालं तर माझ्या कठिण काळात इंडस्ट्रीमधील मनिष पॉल व्यतिरक्त इतर कोणीही मला मदत केली नाही. मनिषने मला केवळ आर्थिक मदतच केली नाही तर मानसिक आधार देखील दिला’ असं राजीव यांनी या मुलाखतीत सांगितलं.

राजीव निगम यांचा मुलगा देवराजचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झालं आहे. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियावर मुलासोबतचा फोटो शेअर करत ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ असं कॅप्शन देत त्यांनी ही दुःखद बातमी शेअर केली होती.

राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केलं आहे. तसंच 'कॉमेडी सर्कस के अजूबे', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'ये तो होना ही' था अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय.

comedian rajeev nigam opens up after his son death says nobody except maniesh paul helped him  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT