मनोरंजन

ऑक्टोबर महिन्यात येणार नवा सीझन; परीक्षक म्हणून विद्या बालन, तब्बू आणि बिपाशा बसूमध्ये चुरस...

संतोष भिंगार्डे

मुंबई : बिग बॉसचे 14 वे सीझन आता लवकरच सुरू होणार आहे. सलमान खानचा प्रोमो आता आऊट झाला आहे. मात्र बिग बॉसच्या घरात कोण असणार हे अद्याप समजलेले नाही. बिग बॉसबरोबरच आता नच बलियेच्या दहाव्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर बिग बॉस तर स्टार प्लसवर नच बलिये अशी जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बहुतेक हे सगळे शोज् ऑक्टोबर महिन्यामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो म्हणजे नच बलिये. या शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आतापर्यंत या शोचे नऊ सीझन झाले आहेत. नवव्या सीझनचे मानकरी ठरले होते प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी. त्यावेळी परीक्षकाच्या खुर्चीत रवीना टंडन आणि अहमद खान होते. आता या शोच्या दहाव्या सीझनची जोरदार तयारी सुरूझाली आहे. परीक्षक म्हणून बिपाशा बसू, विद्या बालन आणि तब्बू यांच्यासह अन्य काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.

नच बलियेमध्ये सेलिब्रेटी स्पर्धक कोण असतील ही नावे अद्याप समजली नसली तरी परीक्षकांच्या खुर्चीत बसण्यासाठी बॉलीवूडच्या तीन किंवा चार नायिकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये बिपाशा बसूचे नाव आघाडीवर आहे. तब्बू आणि विद्या बालनचे नावदेखील चर्चेत आहे. एवढेच नाही तर वैभवी मर्चंट, डेव्हिड धवन आणि विद्या बालन असे त्रिकूटदेखील परीक्षकांच्या खुर्चीत बसतील, असे बोलले जातआहे. सध्या वाहिन्यांनी आपल्या बजेटमध्ये काही कपात केली आहे. त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशाच कलाकारांना परीक्षक म्हणून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT