Vicky Kaushal Instagram
मनोरंजन

विकी कौशलविरुद्ध तक्रार ! असं काय केलं त्याने..?

सकाळ डिजिटल टीम

एका इंदूरच्या रहिवास्याने बॉलवूड अभिनेता विक्की कौशलची (Vicky Kaushal) पोलिसात तक्रार केली आहे. त्याच्या चित्रपटाच्या एका सिनमध्ये अभिनेता सहकलाकार सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत बाईक चालवत होता. त्यांचे हे गाडी चालवण्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.

ANI शी बोलताना तक्रारदार जयसिंग यादव (Jaysingh Yadav) म्हणाले, "चित्रपटाच्या सीन्समध्ये वापरण्यात आलेला वाहन क्रमांक माझा आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही पण हे बेकायदेशीर आहे. ते परवानगीशिवाय माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी स्टेशनवर निवेदन दिले आहे. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे."

तक्रारीला उत्तर देताना इंदूरच्या बाणगंगा भागातील उपनिरीक्षक राजेंद्र सोनी (Rajendra Soni) म्हणाले, "आम्हाला तक्रार आली आहे. नंबर प्लेटचा वापर बेकायदेशीरपणे झाला आहे का ते आम्ही पाहू. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. जर चित्रपट युनिट इंदूरमध्ये असेल तर, आम्ही त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करू."

Vicky Kaushal and Sara Ali Khan

यादव यांनी त्यांच्या लायसन्स प्लेट क्रमांकाची छायाचित्रे आणि पाठवलेल्या पत्राची प्रतही ए.एन.आय (ANI)सोबत शेअर केली. विकी आणि साराचे डी-ग्लॅम फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघे इंदूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करताना दिसले.

अभिनेते निवासी भागातील टेरेसवर एक दृश्य चित्रित करताना देखील दिसले. विकीने कॅज्युअल टी, जीन्स आणि जॅकेट घातले होते, तर सारा पिवळ्या रंगाच्या साडीत दिसून आली. हे दोघे कोणत्या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत हे अस्पष्ट असले तरी, लक्ष्मण उतेकर (Lakshman Utekar) दिग्दर्शित हा अनटायटल रोमँटिक-कॉमेडी असल्याचे अहवाल सांगतात.

सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शकाने सांगितले की तो त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी नवीन जोडी शोधण्यास उत्सुक आहे. पीटीआयला दिलेल्या निवेदनात तो म्हणाला, “मला नेहमीच विकीसोबत काम करायचे होते. तो एक विलक्षण कलाकार आहे. मी त्याचा चाहता आहे आणि या चित्रपटासाठी योग्य आहे, ती हा चित्रपट नक्कीच उत्तम करेल. ही एक नवीन जोडी आहे आणि ते जादू निर्माण करतील," तो म्हणाला.

नोव्हेंबरमध्ये फ्लोरवर गेलेला हा चित्रपट 2022 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.आदित्य धरच्या (Aditya Dhar) 'द इमॉर्टल अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama)मध्ये देखील विकी आणि सारा ऑन-स्क्रीन दिसणार आहेत. हा चित्रपट ट्रायलॉजी (Triology)असेल अशी अपेक्षा आहे, पण तो निधीच्या समस्येमुळे नुकताच थांबवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT