gangubai 
मनोरंजन

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाचं नाव बदला; आमदाराची मागणी

स्वाती वेमूल

काठियावाडी शहराची प्रतिमा मलिन करत असल्याची तक्रार करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी ही मागणी केली आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका भागावर चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही गंगुबाईची भूमिका साकारत आहे. 

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघाचे अमिन पटेल म्हणाले, "कामाठीपुरा हा परिसर गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप बदलल आहे. १९५० च्या दशकात जसा हा परिसर होता, तसा तो आता राहिलेला नाही आणि तिथल्या स्त्रियासुद्धा विविध क्षेत्रात काम करतात. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे काठियावाडी शहराच्या नावाचीही बदनामी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी." इतकंच नव्हे तर या चित्रपटातील कामाठीपुऱ्याचा उल्लेख वगळावा, अशी मागणी तेथे राहणाऱ्या स्थानिकांनी केली आहे. या भागात राहत असल्याने विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असून आता नव्यानं प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामुळे आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची भीती तिथल्या रहिवाशांनी केली आहे. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या टीझरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र त्यातील कामाठीपुऱ्याचा उल्लेख आणि शीर्षकातील काठियावाडी हा शब्द अनेकांना खटकला आहे. आता निर्माते-दिग्दर्शक मागणीनुसार चित्रपटाच्या शीर्षकात बदल करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT