Constitution Day special post of the marathi actress megha ghadge  SAKAL
मनोरंजन

Constitution Day: 'ज्या संविधानाच्या बळावर आपल्या भारताने', संविधानदिनी बाबासाहेबांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

संविधानदिनी अभिनेत्री मेघा घाडगेंची बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

Devendra Jadhav

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगाला आदर्श असं भारताच्या संविधानाची निर्मिती केलीय संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत.

आपल्या संविधानाबाबत जनजागरणासाठी भारतात आजच्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. या खास दिनी अभिनेत्री मेघा घाडगेने खास पोस्ट लिहीली आहे.

मेघा घाडगेंची बाबासाहेबांना आदरांजली

मेघा घाडगेंनी पोस्ट करुन लिहीलंय की, "ज्यांनी संविधान लिहून या उभ्या भारत राष्ट्राला खरे स्वातंत्र्य मिळवून दिले!
ज्या संविधानाच्या बळावर आपल्या भारताने सर्वात मोठ्या लोकशाहीचा किताब मिळवला!
ज्या संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला!
त्या शाश्वत संविधानाचे रचनाकार भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांना आजच्या संविधान दिनी विनम्र अभिवादन!"

भारतीय संविधानाची निर्मिती

भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरूणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्वे रूजवणे. आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

संविधान दिनाचे महत्व काय ?

आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT