teri bhabi song 
मनोरंजन

व्हिडिओ: वरुण धवनने करुन दिली ‘भाभी’ची ओळख

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- वरुण धवन हा बॉलिवूडमधल्या यंगस्टर्स अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो चर्चेत आहे ते त्याच्या आगामी सिनेमामुळे. वरुण लवकरंच 'कुली नंबर वन' या आगामी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमातील 'तेरी भाभी' हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. 

'तेरी भाभी' या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळतेय. जावेद मोहसीन, देव नेगी आणि नेहा कक्कर या तिघांनी मिळून हे गाणं गायलं आहे. शिवाय दानेश साबरी याने या धमाकेदार गाण्याची निर्मिती केली आहे.

‘कुली नंबर १’ हा आगामी सिनेमांपैकी सगळ्यात चर्चेत असलेला सिनेमा आहे तसंच वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड सिनेमांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. 'कुली नंबर १' हा सिनेमा १९९५ साली रिलीज झालेल्या 'कुली नंबर १' चा रिमेक आहे. या सिनेमात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान झळकणार आहेत. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची खूप उत्सुकता आहे. गाण्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता चाहते हिट गाण्यांची आणि रिमेक गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

coolie no 1 first song teri bhabhi song launch varun dhawan sara ali khan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

Oscars 2026 Goodie Bag: बाबो! ऑस्कर जिंकलं नाही तरी नॉमिनींना मिळाली 3.23 कोटींची बॅग, आत नक्की आहे तरी काय?

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी घेतल ताब्यात

SCROLL FOR NEXT