coronavirus trailer 
मनोरंजन

राम गोपाल वर्मांनी केला 'कोरोना व्हायरस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, वाचा कुठे पाहायला मिळेल हा सिनेमा?

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक निरपराध लोकांचे जीव आत्तापर्यंत या महारोगराईने घेतले आहेत. सामान्य माणसांपासून ते श्रीमंतापर्यंत, मजुर कामगारांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच याची झळ मोठ्या प्रमाणावर बसली आहे. हॉलीवूडमध्ये कोरोना व्हायरस सारख्या महारोगराईवर सिनेमे बनवले गेले आहेत मात्र आता याचविषयावर आधारित तेलुगुमध्ये कोरोना व्हायरस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'कोरोना व्हायरस' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज केला आहे. हा ट्रेलर सोशळ मिडियावर धुमाकुळ घालतोय.

सध्या संपूर्ण जग एकाच गोष्टीमुळे घाबरलंय ते म्हणजे कोरोना व्हायरस. सध्याची परिस्थिती आणि यामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली भिती यावर आधारित 'कोरोना व्हायरस' हा सिनेमा निर्माते राम गोपाल वर्मा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. हा सिनेमा तेलुगुमध्ये बनवला गेला आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन अगस्त्य मंजु यांनी केलं असून मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. हा सिनेमा श्रेयस इटी ऍपवर रिलीज केला जाणार आहे. या ट्रेलरच्या शेवटी कोरोना व्हायरसवर आधारित जगातील हा पहिला सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. मात्र कॅनडियन दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी एप्रिलमध्येच 'कोरोना' नावाचा सिनेमा बनवला आहे. 

सोशल मिडियावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करताना राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की, 'या सिनेमाची कथा ही लॉकडाऊनवर आधारित आहे आणि याचं शूट देखील लॉकडाऊनमध्येच केलं गेलं आहे.' इतकंच नाही तर त्यांनी असं देखील म्हटलं की त्यांना हे सिद्ध करुन दाखवायचं होतं की त्यांच काम कोणीच थांबवू शकत नाही तर मग तो देव असो की कोरोना. 'कोरोना व्हायरस' हा सिनेमा हॉरर सिनेमा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.     

 coronavirus trailer ram gopal varma agasthya manju latest movie trailer  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT