Shilpa Raj 3 Team esakal
मनोरंजन

राज-शिल्पाच्या बँक अकाउंटवर 'क्राईम ब्रँचचा वॉच'

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) हा त्याच्या अटकेवरुन चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) हा त्याच्या अटकेवरुन चर्चेत आहे. त्याला पॉर्नोग्राफी व्हिड़िओ तयार करणे आणि ते शेयर करणे यावरुन मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या घरात देखील छापा टाकला होता. या दोघांचे बँक डिटेल्स आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातून एक मोठी बाब समोर आली आहे. (crime branch investigate raj kundra shilpa shetty pnb account know details yst88)

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी आणखी वाढत चालली आहे. तपास यंत्रणा दररोज नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. त्याचा परिणाम शिल्पा आणि बॉलीवूडवर होताना दिसतो आहे. राजला अटक केल्याचे समजताच अनेक अभिनेत्रींनी राजवर टीका केली होती. पुनम पांडे, शर्लिन चोप्रा या अभिनेत्रींनी आपल्याला पैसे देऊन त्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा आग्रह राज करत होता. तसे न केल्यास आपण त्यांचे फोटो व्हायरल करु. अशी धमकीही त्यानं दिली होती.

दोघांच्याही घरांवर छापा टाकल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपला मोर्चा हा त्यांच्या बँक खात्यांकडे वळवला आहे. या दोघांचेही खाते पंजाब नॅशनल बँकेत आहे. आणि ते क्राईम ब्रँचच्या निशाण्यावर आहे. पंजाब नॅशनल बँकेत राज आणि शिल्पा यांचे जॉइंट अकाउंट आहेत. त्या अकाउंटमधून कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन होत असल्याचे दिसून आले आहे. क्राईम ब्रँचला असा संशय आहे की, हॉटशॉप अँप आणि बॉली फेम अॅप असल्यानं त्यांना मिळणार नफा हा त्यांच्या अकाउंटमध्ये येत होता. आणि ते अकाउंट पंजाब नॅशनल बँकेचे होते.

पोलिसांच्या तपासातून पुन्हा एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अकाउंटमधून डिरेक्टली नव्हे तर इनडायरेक्टली पैशांचा व्यवहार होत असल्याचे दिसुन आले आहे. या अकाउंटशिवाय याच बँकेमध्ये राज कुंद्रा यांचे आणखी एक अकाउंट आहे. ते त्यांच्या नावावर आहे. मात्र यात आश्चर्याची बाब अशी की, 2016 पासुन त्या अकाउंटमधून कुठलेही ट्रान्झेक्शन झालेले नाही. एवढेच नव्हे तर त्या अकाउंटमधून कमीत कमी बँलन्सदेखील मेंन्टेन झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT