Dada Saheb Phalke International Film Festival Awards 2023  Esakal
मनोरंजन

Dadasaheb Phalke Award: हा दादासाहेब फाळके पुरस्कार 'नकली'! दादा साहेबांचे नातू म्हणाले, 'लायकी नसतांनाही पैसे...'

सकाळ डिजिटल टीम

Dadasaheb Phalke Award: मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' पार पडला.हा पुरस्कार शासनाकडून दिला जातो असा अनेकांचा समज आहे मात्र मुळात तसं नसून हा पुरस्कार एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.

या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रेखा, आलिया भट्ट, वरुण धवन, अनुपम खेर यांच्यासह अनेक दिग्गज दिसले.

सर्वांनीच कलाकारांना शुभेच्छा दिल्या मात्र दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी या पुरस्कारावर नाराजी व्यक्त केली आहे.

दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ' मुंबई येथे झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात मला अनेकांनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

मी पाहिलं की पैसे घेतल्यानंतर अशा लोकांना पुरस्कार दिले जात आहेत जे या पुरस्काराच्या लायक नाहीत. हे सगळं पाहिल्यावर मी अशा कोणत्याही अवॉर्ड फंक्शन्सला जाणं बंद केलं.

पुढे ते म्हणतात तूम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला फोन आला की ती अमेरिकेत दादासाहेब फाळके पुरस्काराच्या आयोजकाला भेटली आहे आणि पुरस्कारासाठी दहा लाखांची मागणी करण्यात येत आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि नंतर खूप वाईट वाटले.

तर दुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अजय ब्रह्मत्मज यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मजेदार आणि कटू सत्य हे आहे की दादासाहेब फाळके यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार भारत सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या बरोबरीचा मानला जात आहे.

मी भारत सरकार आणि माहिती प्रसारण मंत्रालयाला ते लवकरात लवकर थांबवण्याची विनंती करतो. वरुण धवनवर टिप्पणी करताना त्याने लिहिले की, 'माफ करं वरुण धवन, हा बोगस पुरस्कार आहे. त्याचा इतका अभिमान बाळगू नको. घराच्या कुठल्यातरी कोपर्‍यात लपवं.'

दरम्यान, आलिया भट्ट आणि तिचा पती रणबीर कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर RRR ला वर्षातील आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपट द काश्मीर फाइल्सला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

Deglur Temple Theft : देगलूर तालुक्यातील वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी व दागिन्यांची चोरी; परिसरात खळबळ

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

SCROLL FOR NEXT