Daisy Shah On Dating Rumours With Shiv Thakar: Esakal
मनोरंजन

Daisy Shah On Shiv: खरं सांग तू शिवला डेट करतेय ना? डेझी शेवटी खुलासा करत म्हणाली, आमचं नातं हे..

Vaishali Patil

Daisy Shah On Dating Rumours With Shiv Thakar: बिग बॉस 16 फेम मराठमोळा शिव ठाकरे आणि सलमानच्या 'जय हो' चित्रपटात काम केलेली डेझी शाह हे दोघंही सध्या चर्चेत आहेत.

शिव आणि डेझी हे दोघंही लोकप्रिय स्टंट आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' मध्ये एकत्र आहे. याच शो दरम्यान डेजी शाह आणि शिव ठाकरे यांची मैत्रीही झाली आहे. आता या शोचे शुटिंग संपले आहे. या शोमध्ये दोघांची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली आहे.

शिव आणि डेझी गेल्या काही दिवसांपासून एकत्र वेळ घालवतांना दिसत आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिव आणि डेझी एकमेंकांना डेट करत आहेत अशा अफवादेखील वेगानं सोशल मिडियावर पसरत आहे.

ते एकत्र रील, पोस्ट शेयर करतात. त्याचबरोबर इव्हेंटमध्ये एकमेकांसोबत स्पॉट झाले आहे. त्यांची बाँडिंगमुळे पसरणाऱ्या अफवांवर आता डेझी शाहने प्रतिक्रिया दिली आहे.

शिव ठाकरेसोबत तिच्या नात्यावर आणि डेटिंगच्या अफवांबद्दल बोलताना डेझी म्हणाली की, तिच्या शिव ठाकरेंसोबतच्या लिंकअपच्या अफवा पसरत असल्या तरी त्याचा दोघांच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होत नाही.

जोपर्यंत ती आणि शिव त्यांच्या नात्याची किंवा डेटिंगची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत लोकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी आम्ही डेट करत आहोत किंवा रुमर्ड कपल आहोत अशी अटकळ बांधू नये. आम्ही ते स्वतःच करू शकतो. आता सध्या तरी आम्ही फक्त मित्र आहोत

दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरत आहे त्याचा परिणाम त्याच्या मैत्रीवर पडतो का असं विचरल्यावर डेझीनं सांगितलं की, त्यामुळे आमच्या बाँडिंगवर किंवा मैत्रीवर परिणाम होत नाही. खरं तर, पुर्वीपेक्षा आत्ता आमचं मैत्रीचं नात अधिक घट्ट झालं आहे. तिला तिचे वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना सांगायला आवडत नाही.

आता सध्या तरी दोघंही चांगले मित्र आहेत. असं उत्तर डेझीनं दिलं आहे. चाहत्यांना शिव आणि डेझीची जोडी खुप आवडते. त्याचे व्हिडिओ जेव्हाही व्हायरल होतात तेव्हा चाहते त्याच्या जोडीला हिट जोडी म्हणतात. त्याच्या चाहत्यांना दोघांना एकत्र चित्रपट, वेब सिरीजमध्ये पहायची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT