Daler Mehndi  
मनोरंजन

दलेर मेहंदी एका गाण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

मुलाखतीत सांगितलं बॉलिवूडमधील गाणी कमी गाण्यामागचं कारण

स्वाती वेमूल

गायक दलेर मेहंदी Daler Mehndi यांनी बॉलिवूडमधील अनेक दमदार गाणी गायली आहेत. मात्र सध्या ते बॉलिवूडमधील फारशी गाणी गाताना दिसत नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागील खरं कारण सांगितलं आहे. त्याचसोबत एका गाण्यासाठी ते किती मानधन घेतात, याचाही खुलासा त्यांनी केला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत दलेर म्हणाले, "एखाद्या गाण्याच्या रेकॉर्डिंगची प्रक्रिया कशी असते, ते मी तुम्हाला सांगतो. सर्वांत आधी मुंबईत डमी गायकाकडून गाणं रेकॉर्ड केलं जातं. त्यानंतर तेच गाणं इतर स्ट्रगलिंग किंवा नव्या गायकांकडून रेकॉर्ड केलं जातं. नंतर त्यांना जो गायक हवा असतो, त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग पक्कं केलं जातं. माझ्याबाबतीत उलट आहे. आधी मी मानधन स्वीकारतो आणि त्यानंतर गाणं रेकॉर्ड करतो. सहा लाख रुपये आणि जीएसटी इतकं मानधन मी घेतो. त्यामुळे चित्रपटातून माझं गाणं कधीच काढलं जात नाही, कारण त्यांनीच आधी मला विचारलेलं असतं. अनेकांना माझं मानधन परवडत नाही, निवडक गाणीच मला आवडतात आणि मार्केटमध्ये मला घाणेरडं काम करायचं नाही, यांमुळे मी सध्या कमी गाणी गातोय."

रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक होण्याबाबतही दलेर मेहंदी यांचं तेच मत आहे. "मी मोफत काम करणार नाही, हे आधीच निर्मात्यांना स्पष्ट करतो. रिअॅलिटी शोजचा बजेट कोट्यवधी रुपयांचा असतो. ते जेव्हा पैसे कमावतात, तेव्हा त्यातील काही रक्कम मलासुद्धा मिळणं अपेक्षित आहे आणि मी अत्यंत प्रामाणिक परीक्षक म्हणून काम करतो. मला जे वाटतं ते मी प्रामाणिकपणे सांगतो", असं ते पुढे म्हणाले.

दलेर यांनी 'बोलो ता रा रा', 'तुनक तुनक तुन', 'हो जाएगी बल्ले बल्ले', 'ना ना ना ना रे' यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. 'रंग दे बसंती' आणि 'दंगल' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी हिट गाणी दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT