de dhakka 2 movie trailer released mahesh manjrekar siddharth jadhav shivaji satam makarand anaspure sakal
मनोरंजन

De Dhakka 2: मराठी माणसाला कधी कमी लेखायच नाही, 'दे धक्का 2' चा धमाकेदार ट्रेलर..

महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित 'दे धक्का 2' चा ट्रेलर पाहून अधिकच उत्सुकता वाढली आहे.

नीलेश अडसूळ

de dhakka 2 : महेश मांजरेकरांचा 'दे धक्का' चित्रपट अजूनही आपण विसरलेलो नाही. हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या या चित्रपटाने आपलं पुरतं मनोरंजन केलं. या चित्रपटाचा दुसरा भागही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती आणि महेश मांजरेकर यांनी ती पूर्ण केलीही. पण करोना काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्तच मिळाला नाही. पण आता हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी रिलीज होत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. नुकताच यांचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. शिवाय दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली. (mahesh manjrekar shared marathi movie de dhakka 2 trailer released)

पहिल्या भागात आपण कोल्हापूर ते मुंबई प्रवास पाहिला. पण आता जाधव कुटुंबाची मजल पार वरपर्यंत गेली आहे. कारण 'दे धक्का 2' मध्ये जाधव कुटुंब लंडन वारीसाठी जाणार आहे. या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंब विमानातून उतरतून एका आलीशान गाडीतून मोठ्या हॉटेलात पोहोचलेले दाखवलेले आहे. तिथे असलेल्या माणसांकडून मकरंद यांचा अपमान होतो, यावेळी 'मराठी माणसाला कमी लेखायच नाही' असं मंकरद जाधव म्हणतो. ट्रेलर मधील हे वाक्य सर्वाधिक पसंतीस उतरले आहे. (de dhakka 2 movie trailer out)

एवढेच नाही तर लंडनमध्ये जाधव कुटुंबावर एक संकट आलेलं आहे. एका गुन्ह्याखाली त्यांना अटक होऊ शकते असे दाखवण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची वेळ येणार असे संवादही ऐकू येतात. पण सूर्यभान जाधव मात्र सर्वांना हारायचं नाही अशी प्रेरणा देऊन उभारी देतात. त्यामुळे या संकटातून जाधव कुटुंबीय कसे बाहेर पडणार हे बघण्यासारखे आहे. पहिल्या भागात टमटम होती तर या भागात एक जुनी खटारा गाडी आहे. शिवाय लंडन मध्ये मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, किस्ना, धनाजी, हेमल्या आणि तात्या असे सर्वचजन असल्याने धमाल येणार आहे.

मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संतोष खापरे, सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे यात सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून आनंद इंगळे देखील आहे. नुकत्याच आलेल्या या ट्रेलरला बरीच पसंती मिळताना दिसत आहे. या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यामुळे दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार हे लवकरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Employee Property : ४४ भूखंड, किलोभर सोने, कोटींचा बँक बॅलन्स अन्... कर्मचाऱ्याची ‘सोनेरी’ कमाई पाहून तपास यंत्रणाही हादरली !

Delhi : दिल्लीत सुरक्षा रामभरोसे! चोरट्यांनी महिला खासदाराची सोन्याची चेन हिसकावली, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...

Kharadi IT Hub : खराडी आयटी हबमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता; व्यावसायिकांना टोळक्यांची दहशत

SCROLL FOR NEXT