Deadpool 3 Teaser eSakal
मनोरंजन

Deadpool 3 Teaser : डेडपूल अन् वुलव्हरीन मिळून बदलणार मार्व्हलचं जग; 'एक्स-मेन' अन् 'अव्हेंजर्स' येणार एकत्र! पाहा भन्नाट टीझर

Deadpool in MCU : या टीझरमध्ये सुरुवातीला दिसतंय की डेडपूलच्या चित्रपटांमध्ये सुरुवातीपासून असलेले काही कॅरेक्टर्स मिळून वेड विल्सनचा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र, अचानक TVA चे काही लोक त्याला घेऊन जातात.

Sudesh

Deadpool and Wolverine Teaser : डेडपूल 3 या बहुप्रतिक्षित मार्व्हल सिनेमाचा टीझर अखेर समोर आला आहे. Super Bowl 2024 मध्ये हा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'डेडपूल अँड वुलव्हरीन' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. यावर्षी 26 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Deadpool 3 release date)

या चित्रपटाची खासियत म्हणजे यामध्ये वेड विल्सन, म्हणजेच डेडपूल आणि वुलव्हरीन हे दोघे सध्याच्या MCU टाईमलाईनमध्ये दाखवले आहेत. यामुळेच एक्स-मेन युनिव्हर्स आणि अव्हेंजर्स युनिव्हर्स हे एकमेकांमध्ये मिक्स होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या टीझरमध्ये सुरुवातीला दिसतंय की डेडपूलच्या चित्रपटांमध्ये सुरुवातीपासून असलेले काही कॅरेक्टर्स मिळून वेड विल्सनचा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र, अचानक TVA चे काही लोक त्याला घेऊन जातात. मार्व्हलच्या 'लोकी' सीरीजमध्ये टीव्हीएबाबत माहिती दिलेली आहे. टीव्हीएमध्ये घेऊन गेल्यानंतर 'पॅराडॉक्स' डेडपूलला मार्व्हलच्या हीरोजची माहिती देतो, आणि त्या युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची ऑफर देतो.

बहुप्रतिक्षित क्रॉसओव्हर

मार्व्हलचे एक्स-मेन आणि अव्हेंजर्स हे वेगवेगळे आहेत. एक्स-मेनमध्ये वुलव्हरीन, बीस्ट, डेडपूल, रोग, जीन ग्रे, चार्ल्स झेवियर अशा विविध सुपरहीरोंचा समावेश होतो. तर अव्हेंजर्समध्ये आयर्न मॅन, थॉर, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक व्हिडो, डॉक्टर स्ट्रेंज अशा सुपरहीरोंचा समावेश होतो.

यापूर्वी मार्व्हलच्या इन्फिनिटी वॉर सागामध्ये 'गार्डियन्स ऑफ दि गॅलेक्सी'चे हीरोज अव्हेंजर्ससोबत आले होते. यासोबतच स्पायडरमॅनही या टीममध्ये सहभागी झाला होता. या क्रॉसओव्हरमुळे मार्व्हल फॅन्स अगदीच खुश झाले होते. आता एक्स-मेन युनिव्हर्स देखील यात सहभागी होताना दिसत असल्यामुळे हा चित्रपट देखील MCU चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

SCROLL FOR NEXT