Debina Bonnerjee Pregnant News Debina Bonnerjee Pregnant News
मनोरंजन

चार महिन्यांपूर्वी मुलीचा जन्म आता पुन्हा गरोदर; देबिना बॅनर्जीचा फोटो व्हायरल

देबिना खूप दिवसांपासून गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करीत होती

सकाळ डिजिटल टीम

Debina Bonnerjee Pregnant News टीव्हीवरील दाम्पत्य देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) व गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) यांच्या घरी पुन्हा एकदा आनंद छोट्या पावलांनी येणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

या दाम्पत्याने फॅमिली फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये चार महिन्यांची मुलगी लियाना गुरमीत (Gurmeet Choudhary) व देबिनासोबत दिसत आहे. परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये या दाम्पत्याने चौथ्या सदस्याच्या आगमनाची घोषणा केली आहे. देबिनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. गुरमीतने मुलगी लियानाला मांडीवर घेतले आहे.

फोटोमध्ये गुरमीत बॅक पोजमध्ये आहे. तर देबिना (Debina Bonnerjee) गुरमीतकडे पाहत आहे. सोबतची सोनोग्राफीचा फोटो दाखवत आहे. फोटोमध्ये मुलगी लियानाचा निरागसपणा पाहायला मिळत आहे. लियाना कॅमेराकडे पाहते. ‘नशीब काही निर्णय ठरवते. ते कोणीही बदलू शकत नाही. हा त्या आशीर्वादांपैकी एक आहे. लवकरच आम्हाला भेटायला येत आहे’ असे आनंदाची बातमी जाहीर करताना जोडप्याने लिहिले.

देबिनाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसी (Pregnant) पोस्टमुळे चाहत्यांना आनंदी होण्याची मोठी संधी मिळाली आहे. सेलेब्स आणि चाहते या जोडप्याचे अभिनंदन करण्यात व्यस्त आहेत. ही बातमी ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. युविका चौधरी, रश्मी देसाई, माही वीज, टीना दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी या बातमीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेक समस्यांचा सामना करावा लागला

देबिनाने ३ एप्रिल २०२२ला मुलीला जन्म दिला होता. देबिना खूप दिवसांपासून गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करीत होती. देबिनाला पहिल्या बाळासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या गर्भधारणेसाठी ती पाच वर्षे प्रयत्न करीत होती. परंतु, तिला गुंतागुंतीतून जावे लागले. पाचवेळा ती या प्रक्रियेत अपयशी ठरली होती.

११ वर्षांनंतर देबिना झाली आई

देबिनाने दोनवेळा IVFs आणि तीनवेळा IUIs उपचार केले होते. देबिनाच्या अनेक थेरपी झाल्या होत्या. गरोदर होत नसल्याने देबिना अनेकदा रडली. लग्नाच्या ११ वर्षांनंतर देबिनाला आई होण्याचा आनंद मिळाला. आता नशीब बघा, पहिल्या अपत्याच्या चार महिन्यांनंतरच देबिनाला दुसऱ्यांदा आई होण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...

Rally of Maharashtra 2026 : नाशिकमध्ये 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा थरार! मस्कारेहास डीन विजयाचा प्रबळ दावेदार, तर आदित्य ठाकूर स्पर्धेतून बाद

Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Nashik News : नाशिकमध्ये 'विरासत'चा जागर! अक्षय कुमारची रिक्षामधून ग्रँड एन्ट्री, एमईटी उत्सव जल्लोषात

Mohol News: मोहोळ येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी बारा संशयीत निष्पन्न करण्यात मोहोळ पोलीसांना यश

SCROLL FOR NEXT