deepa chaudhari feeling happy when sachin tendulkar video call her after watching baipan bhaari deva  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: मी त्या संधीला मुकले.. सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ कॉल आल्यावर बाईपण भारीच्या चारुची प्रतिक्रिया

खुद्द सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ कॉल आल्यावर दीपाने पहिली प्रतिक्रिया दिली

Devendra Jadhav

बाईपण भारी देवा सिनेमाची सगळीकडे हवा आहे. बाईपण भारी देवा सिनेमाचं विशेष स्क्रिनींग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आयोजित केलं होतं.

या स्क्रिनींगला सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते अजित भुरे आणि सिनेमाचे कलाकार उपस्थित होते. पण मालिकेच्या शुटींगमुळे बाईपण.. मधली चारु म्हणजेच अभिनेत्री दीपा चौधरी उपस्थित नव्हती.

दीपाला सचिनने व्हिडीओ कॉल लावला होता. खुद्द सचिनचा व्हिडीओ कॉल आल्यावर दीपाचा आनंद गगनात मावेनासा झाला. दीपाने सोशल मिडीयावर तिच्या भावना व्यक्त केल्यात

(deepa chaudhari feeling happy when sachin tendulkar video call her after watching baipan bhaari deva)

माझ्यासाठी ही फॅन मोमेंट

दीपाने सचिनचा व्हिडीओ कॉल आल्याचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "THE DREAM COME TRUE MOMENT.. सचिन... द सचिन तेंडुलकर... लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं... ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील... त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण...YES...It’s Fact... शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण."

अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं वाटतंय

दीपा चौधरी पुढे लिहीते.. "मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो... आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो...

आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं... अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी."

दीपाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सचिन तेंडुलकर तिचा क्रश आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे सचिनचा व्हिडीओ कॉल आल्याने दीपा एकदम खुश झाली असेल, यात शंका नाही

बाईपण भारी देवा पाहून सचिन तेंडुलकर म्हणाला

याशिवाय बाईपण भारी देवा पाहून सचिन तेंडुलकर म्हणाला.. "बाईपण भारी देवा ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खुप आनंद झाला.

आणि मी, माझी आई आणि माझी मावशी हा सिनेमा पाहतायत याची मी वाट बघतोय. शिवाय चित्रपटातील कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT