Deepa Parab wants to play role in shyamchi aai biopic movie and phulrani marathi natak sakal
मनोरंजन

Deepa Parab: अभिनेत्री दीपा परबला करायचाय बायोपीक.. 'या' दोन व्यक्तिरेखा भरल्यात मनात..

सकाळ पॉडकास्टमध्ये अभिनेत्री दीपा परबने सांगितल्या काही खास गोष्टी..

नीलेश अडसूळ

Actress Deepa parab Podcast: झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. एक गृहिणी जेव्हा स्वतच्या पायावर उभी राहते तेव्हा तिची जिद्द, तिला होणारा विरोध आणि तिच्या यशाची गोष्ट या मालिकेतून मांडण्यात आली आहे.

या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दीपानं पुन्हा मालिकेतनं पदार्पण केलं आहे. तिनं आपल्या संसाराची घडी बसवल्या नंतर पुन्हा अभिनयाकडे येण्याचं ठरवलं..

पण आता दीपा इतक्यात थांबणार नाही. ती पुढे काम करत राहणार आहे. त्यामुळे मालिका आणि चित्रपटात ती आपल्याला दिसेलच. पण याच सोबत दीपाच्या मनात काही खास भूमिका आहेत. ज्या तिला आवर्जून साकारायच्या आहेत. या विषयी ती सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत बोलली आहे.

(Deepa Parab wants to play role in shyamchi aai biopic movie and phulrani marathi natak)

दीपा या मुलाखतीत म्हणाली आहे की, आता मनोरंजन विश्व खूप बदललं आहे. तुम्ही अमुक एका वयातच काम करायला हवं असं काही नाही. तुम्हाला त्या त्या वयात तशा चांगल्या भूमिका मिळत जातात, तुम्ही फक्त काम करत राहायला हवं.

याच मुलाखतीत दीपानं आपल्याला बायोपीकमध्ये काम करायची संधी मिळाली तर ती व्यक्तिरेखा कोणाची असेल यावर देखील दीपा परबनं खुलासा केला आहे. दीपा म्हणाली, 'मला श्यामची आई साकारायला खूप आवडेल. कारण एक आई म्हणून त्या भूमिकेशी माझं खूप जवळच नातं आहे. मी माझ्या मुलाला घडवताना श्यामच्या आईच्या भूमिकेचा खूप विचार करते. त्यामुळे तशी संधी कुणी दिली तर मला खूप आवडेल' असं ती म्हणाली.

एवढेच नाही तर नाटकात काम करण्याची इच्छा ही तिने व्यक्त केली. दीपा म्हणाली, 'फुलराणी' हे माझ्या खूप आवडीचं नाटक आहे. त्यातली फुलराणी हे पात्र साकारायला मला खूप आवडेल.

यासोबतच दीपाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींचा उलगडा या मुलाखतीत केला आहे. तेव्हा ही मुलाखत सविस्तर ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI : भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी तगडा ऑलराऊंडर दिसणार किंवा...

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट; ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

Pune Book Festival : 'शांतता... पुणेकर वाचत आहेत'; 5 लाखांहून अधिक पुणेकर एकाच वेळी वाचून घडवणार वाचनाचा विश्वविक्रम

Leopard Attack : पारनेर तालुक्यातील धक्कादायक घटना ! 'बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू'; अंत्यसंस्कारास नकार, पती-पत्नी शेतात गेले अन्..

Shahid Kapoor: ‘वडिलांचं नाव कधीच वापरलं नाही’; शाहिद कपूरच्या स्पष्ट कबुलीनं घराणेशाहीवरील चर्चा पुन्हा पेटली

SCROLL FOR NEXT