Deepika Padukone, Ranbir Kapoor Google
मनोरंजन

दीपिका आजही रणबीरला टोचून बोलायची संधी सोडत नाही;पहा काय म्हणालीय...

'गहराइयां' च्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या एका वक्तव्यावरुन चर्चा सुरू झालीय.

प्रणाली मोरे

दीपिका पदूकोण(Deepika padukone) सध्या चर्चेत आहे ती तिच्या 'गहराइयां'(Gehraiyaan) सिनेमाच्या निमत्तानं या सिनेमात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी,अनन्या पांड्ये(Ananya Pandey) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात भावनांचा कल्लोळ,नात्यातलं कनफ्युजन दाखवण्यात दिग्दर्शकाची कसरत झाली असणार असं राहून राहून सिनेमा पाहताना वाटतं. सिनेमा पाहिल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. म्हणजे कुणाला सिनेमा आवडला तर कुणाला तो डोईजड वाटला. यातील किसिंग,न्यूड सीन्सचा भडिमार हा डोक्याला एक वेगळाच ताप. पण हा सिनेमा आपल्या खूप जवळचा आहे असं दीपिका तिच्या अनेक मुलाखतींमधून सांगत सुटलीय. इतकंच काय प्रदर्शनानंतरही ती जमेल तसं सिनेमाचं प्रमोशन करीत आहे. नुकत्याच एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं एका प्रश्नावर जे उत्तर दिलं आहे त्यावरनं आता एक वेगळीच चर्चा रंगलीय. चला जाणून घेऊया प्रश्न काय होता अन् दीपिकानं उत्तर काय दिलंय ते.

दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला होता की,'प्रेमात धोका मिळणं ही तुझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे? तू या गोष्टीकडे कसं पाहतेस?'. आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की रणवीर सिंगला भेटण्यापूर्वी दीपिका रणबीर कपूरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्या दोघांनी तशी मीडियासमोर कबुलीही दिली होती. पण रणबीरनं दीपिकाला प्रेमात धोका दिला,म्हणजे तो एकाच वेळेस दोन अभिनेत्रींना डेट करीत होता हे दीपिकाला समजलं आणि मोठं प्रकरणच पुढे घडलं जे आपल्या सर्वांनाच माहित असेल. दीपिकानं त्यानंतर अनेक कार्यक्रमात उघडपणे रणबीरच्या विरोधात बोलणं सुरू केलं. रुषी कपूर म्हणजे रणबीरचे दिवंगत वडील,ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते यांनीही उघडपणे यासाठी दीपिकाविषयी नाराजगी व्यक्त केली होती. पुढे हळूहळू सगळं नीट झालं खरं. पण या ब्रेकअपचा म्हणे दीपिकाला खूप मोठा धक्का बसला होता. तिनं डिप्रेशनचाही सामना केला होता अशी खबर आहे. रणबीरनंही नंतर त्याला त्याची चूक कळाल्यानंतर नकळत अनेकदा जाहिरपणे त्याविषयी दीपिकाच्या नावाचा उल्लेख न करता बोलून दाखवलं होतं.

तर आता अनेक वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. दीपिका छान रणवीर सिंग सोबत सुखाने संसार करतेय. तिकडे रणबीरही आलियासोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. दीपिका-रणबीर आता खूप चांगले मित्र आहेत वगैरे,वगैरे. पण तरीही प्रेमात धोका,लबाडी असे प्रश्न आले की दीपिका पुन्हा भूतकाळात डोकावते हे अनेकदा दिसून आलंय. तर त्या विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली,''माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा. एकमेकांची सोबत एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला त्यात आनंद मिळत नसेल तर वेगळं होणं उत्तम. पण दुसऱ्याला अंधारात ठेवून,त्याला धोका देत प्रेमाचं खोटं नातं निभावणं मला पटत नाही. मी या गोष्टींचा खूप वाईट अनुभव घेतला आहे,त्यातनं मी हे चांगलं शिकलेय की नातं कसं असावं,कसं टिकवावं,त्यामुळे माझ्यासाठी प्रेमात धोका ही खूप वाईट गोष्ट,मोठी गोष्ट आहे''. आता दीपिकाच्या या वक्तव्यामुळे मात्र भलतीच चर्चा रंगलीय. आजही दीपिका रणबीरला टोचून बोलण्याची संधी सोडत नाही हे यावरनं उघडपणे दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT