Deepika Padukone & Ananya Pandye bold Photoshoot in Deep Sea
Deepika Padukone & Ananya Pandye bold Photoshoot in Deep Sea Instagram
मनोरंजन

Photo: समुद्राच्या तळाशी दीपिका-अनन्या, पाण्यातही लावली आग...

प्रणाली मोरे

दीपिका पदूकोण(Deepika Padukone) आणि अनन्या पांडे (Ananya Pandye) यांच्या 'गहराइयां' (Gehraiyaan) सिनेमावर प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाकडून खरंतर चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या,पण काहींना या सिनेमाचं कथानक तर काहींना यातील खूपच बोल्ड असलेले काही सीन पसंतीस उतरले नाहीत. पण या अशा बातम्यांची जराही पर्वा न करता या सिनेमातील अभिनेत्री दीपिका आणि अनन्या या दोघी बिनधास्त मजा करताना दिसत आहेत. या दोघींनी नुकतंच समुद्राच्या तळाशी जाऊन बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. सिनेमाच्या थीम ला परफेक्ट मॅच करेल असं हे हॉट फोटोशूट आहे. या फोटोत दीपिकानं ऑरेंज कलरची तर अनन्यानं पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. दोघीही एकदम बीच बेब्स वाटत आहेत. (Deepika Padukone & Ananya Pandye bold Photoshoot in Deep Sea)

दीपिकानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात दिसत आहे की, ती पाण्याच्या तळाशी अगदी कसली पर्वा न करता कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. दोन्ही फोटोतल्या तिच्या भावना पाण्यातही आग लावत आहेत. या दोन्ही फोटोत खरंतर तिच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही आहेत. पण तिच्या चेहऱ्यावरचे शांत भावही खूप शोभून दिसत आहेत. दीपिकानं या पोस्टला समर्पक असं कॅप्शन देताना लिहिलंय,''सगळ्यात सुरक्षित जागा हवी असेल तर समुद्राच्या तळाशी या''. हा खरं तर एका थोर विचारवंतानं लिहिलेला विचार आहे. जो दीपिकानं इथं लिहिला आहे.

'गहराइयां' चे प्रमोशन अजुनही सुरूच आहे. दीपिकानंतर अनन्यानं पण तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिनं कॅप्शन देताना लिहिलंय,''जलपरी''. तिनं पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तिनं देखील खूप बोल्ड पोज दिल्या आहेत. 'गहराइयां' सिनेमात इंटिमेट सीन दिल्यामुळेच नाही तर अभिनयामुळेही अनन्या सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर या फोटोंना घेऊन मीम्सही बनत आहेत. या फोटोंवर सर्वसामान्य चाहत्यांपासून बॉलीवूड सेलिब्रिटी देखील प्रतिक्रिया देत आहेत. मलायका अरोरानं हार्ट इमोजी पोस्ट करीत ''ब्यूटी'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुहाना खाननंही अनन्याच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT