ranveer deepika 
मनोरंजन

अतरंगी फॅशननंतर आता अतरंगी डान्ससुद्धा; रणवीर-दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल 

सकाळ ऑनलाइन

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमध्ये सर्वात हटके कपल म्हणून ओळखले जातात. दीपिकाचा क्युटनेस आणि रणवीरचा हटके अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. रणवीरच्या ड्रेसिंग सेन्सवर नेटकरी नेहमीच कमेंट करत असतात. त्याच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी ड्रेसमुळे त्याला अनेकदा ट्रोल केले जाते. पण आता रणवीची पत्नी दीपीकासुद्धा या हटके ड्रेसिंग सेन्सची कॉपी करताना  दिसत आहे. दीपिकाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये रणवीर आणि दीपिका अतरंगी डान्स करताना दिसत आहेत. 

दीपिकाने या व्हिडीओला Werk it baby असं कॅप्शन दिले असून #bussitchallenge चा हॅशटॅग तिने या व्हिडीओला दिला. या व्हिडीओमध्ये  दीपीका फ्लोरल प्रिंन्टच्या कलरफूल नाईट सूटमध्ये दिसत आहेत. त्याच प्रिंटची टोपी तिने घातली आहे. तर रणवीरने लाल रंगाची टेडी बिअरचं चित्र असलेली पॅट, जॅकेट आणि हॅट घातली आहे. दोघांच्या या भन्नाट डान्सच्या व्हिडीओला अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केली आहे. या व्हिडीओला काही वेळातच 11 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

2018 मध्ये दीपिका आणि रणवीरने लग्नगाठ बांधली. लवकरच दोघांचा '83' हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रणवीर  विश्वचषकाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका करणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT